Union Budget 2019: 2022पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट, अर्थसंकल्पावर मोदी खूश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 04:48 PM2019-07-05T16:48:22+5:302019-07-05T16:48:47+5:30
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज बजेट सादर केला आहे.
नवी दिल्लीः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज बजेट सादर केला आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचं सर्वसमावेशक बजेट मांडल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. निर्मला सीतारामण आणि त्यांच्या टीमला चांगला बजेट सादर केल्याबद्दल शुभेच्छा देतो. 2022पर्यंत शेतकऱ्यांची उत्पन्न दुप्पट करण्यासाठी लाभदायी ठरणार आहे. बजेटमध्ये भावी पिढ्यांचाही विकासाची संकल्पना आहे. देशाला समृद्ध, प्रत्येकाला समर्थ बनवणारा हा बजेट आहे. या बजेटनं गरिबाला बळ मिळणार असून, तरुणांना चांगलं भविष्य मिळणार आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. पुढे मोदी म्हणतात, बजेटमधून मध्यमवर्गाची प्रगती होणार आहे. विकासाच्या प्रगतीला गती मिळणार असून, या बजेटनं टॅक्स व्यवस्थेत सुधारणा होणार आहे. हा बजेट उद्यम आणि उद्यमशील लोकांना मजबूत करणारा आहे. या बजेटमुळे देशाच्या विकासात महिलांची भागीदारी आणखी वाढणार आहे. पायाभूत सुविधांमध्ये सुधारणार होणार आहेत. बजेटमुळे शिक्षण क्षेत्रात उत्साह वाढणार आहे.
My thoughts on the #BudgetForNewIndia. Watch. https://t.co/cJYfirRHfa
— Narendra Modi (@narendramodi) July 5, 2019
हा आर्टिफिशेल इंटेलिजन्स अन् स्पेस रिसर्चला लोकांमध्ये पोहोचवणार आहे. या बजेटमध्ये जागतिक आर्थिक सुधारणा आहेत. बजेटमध्ये गाव आणि गरिबांचं कल्याण होणार आहे. हा बजेट ग्रीन बजेट आहे. पर्यावरण, इलेक्ट्रिक मोबिलिटी, सोलारवर विशेष भर देण्यात आलं आहे. गेल्या पाच वर्षांत देशानं नैराश्याचं वातावरण मागे सोडलं आहे. देश आत्मविश्वासानं भारलेला असून, प्रगतिपथावर आहे. सामान्य माणसाच्या जीवनात नव्या आकांशा निर्माण होणार आहेत.
Agriculture and Rural Budget 2019: अर्थसंकल्पात गावांसाठी, शेतकऱ्यांसाठी काय खास?; जाणून घ्या... https://t.co/0iMLSfclKI#Budget2019
— Lokmat (@MiLOKMAT) July 5, 2019
देशाची गती योग्य असल्यानं निर्धारित लक्ष्यापर्यंत लवकरच पोहोचू. हा बजेट न्यू इंडियासाठी फायदेशीर ठरणार आहे. देशाचा मार्ग निर्धारित करण्यासाठी बजेट महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. गरीब, सोशितांना सशक्त करण्यासाठी आमच्या सरकारनं पावलं उचलली आहेत. शेतकरी, वंचित, पीडितांना सशक्त करण्यासाठी प्रयत्न केले आहेत, 5 लाख करोडची अर्थव्यवस्था करण्यासाठी हा बजेट प्रेरणादायी ठरणार आहे.