Budget 2021 : "सर्व सामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारा अर्थसंकल्प असेल"
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 10:43 AM2021-02-01T10:43:44+5:302021-02-01T10:52:53+5:30
Budget 2021 Latest News and Updates : महागाईने मेटाकुटीला आलेल्या जनतेला अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. याच दरम्यान अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी अकरा वाजता संसदेत अर्थसंकल्प (Union Budget 2021-22) सादर करणार आहेत. रोजगारनिर्मितीला चालना देण्याबरोबरच सामान्यांना प्राप्तिकरात सवलती, ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ, आरोग्य क्षेत्राला उभारी, उद्योगांना भरघोस सवलती इत्यादींसाठी सर्वंकष तरतुदी करण्याची आवश्यकता भासणार असून आज सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडून याच अपेक्षा असतील. टाळेबंदीने आक्रसलेला रोजगाराचा बाजार आर्थिक लसीच्या प्रतीक्षेत आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनीची अपेक्षा आहे. आरोग्य क्षेत्रही बूस्टरच्या अपेक्षेत आहे. तर उद्योगांना सवलतींची आवश्यकता आहे. इंधनदर रोज नवे विक्रम स्थापित करत असल्याने महागाईने मेटाकुटीला आलेल्या जनतेला अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. याच दरम्यान अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अनुराग ठाकूर यांनी सर्व सामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारा अर्थसंकल्प असेल असं म्हटलं आहे. संसदेत आज अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी ठाकूर यांनी आपल्या घरी पूजा-अर्चना केली आहे. तसेच "सर्व सामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारा अर्थसंकल्प असेल. 'सबका साथ, सब विकास, सबका विश्वास' या मोदींच्या घोषवाक्यावर सरकारने आत्मनिर्भर पॅकेजची घोषणा केली होती. भारताला कोरोना संकटातून वाचवण्यासाठी तसेच अर्थव्यवस्थेला तेजीने रुळावर आणण्यासाठी नवी दिशा देण्यात आली" असं अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे.
“ #UnionBudget2021 सबका साथ ,सबका विकास ,सबका विश्वास के मूलमंत्र के साथ प्रधानमंत्री श्री @narendramodi जी के आत्मनिर्भर भारत विजन को साकार करने की दिशा में एक मील का पत्थर साबित होगा”
— Office of Mr. Anurag Thakur (@Anurag_Office) February 1, 2021
श्री @ianuragthakur
| @FinMinIndia | pic.twitter.com/sNL5AUTbiS
बजेटच्या दिवसाची सुरुवात गोड; सेन्सेक्स ४४३ अंकांनी वधारला
देशाचा अर्थसंकल्प आज संसदेच्या पटलावर ठेवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात चांगलं वातावरण पाहायला मिळत आहे. बाजार उघडाच सेन्सेक्सने ( Sensex ) ४४३ अंकांची उसळी घेतली आहे. तर निफ्टीनंही ( nifty ) ११४ अंकाची वाढ नोंदवली आहे. शेअर बाजाराचे व्यवहार सुरु होताच सकाळच्या सत्रात सेन्सेक्स ४४३ अंकांच्या वाढीसह ४६,७२८ अंकांसह सुरू झाला आहे. तर निफ्टी ११४.८५ अंकांच्या वाढीसह १३,७४९.४५ वर उघडला आहे.
दरम्यान, शुक्रवारी 'बीएसई'च्या ३० शेअरवर आधारित प्रमुख सेन्सेक्स २,५९२.७७ अंक म्हणजेच ५.३० टक्क्यांनी घसरून ४५,२८५.७७ वर बंद झाला होता. तर 'एनएसई'च्या ५० शेअरवर आधारित प्रमुख निफ्टीही मागच्या आठवड्याच्या तुलनेत ७३७.३० अंकांनी म्हणजेच ५.१३ टक्क्यांनी घसरून १३,६३४.६० वर बंद झाला. या महिन्यात ऐतिहासिक उच्चांकापर्यंत पोहोचल्यानंतर सेन्सेक्स जवळपास ४,००० अंकांनी कमी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. तर निफ्टीत १,००० अंकांची घसरण झाली होती.
Delhi: MoS Finance Anurag Thakur offers prayers at his residence, ahead of the presentation of the #UnionBudget 2021-22 in the Parliament today. pic.twitter.com/EtVFtzrNj7
— ANI (@ANI) February 1, 2021