Union Budget 2022 Live Updates: करदात्यांची मोठी निराशा; सलग आठव्या वर्षी कररचना जैसे थेच!

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 07:26 AM2022-02-01T07:26:52+5:302022-02-01T17:29:14+5:30

Union Budget 2022 Live updates- FM Nirmala Sitharaman delivers budget speech at parliament: सीतारामन यांच्या अर्थसंकल्पातून मध्यमवर्गीय नोकरदार वर्गाला करदिलासा नाहीच; टॅक्स स्लॅब जैसे थे

Union Budget 2022 Live Updates india Finance Minister Nirmala Sitharaman at parliament  | Union Budget 2022 Live Updates: करदात्यांची मोठी निराशा; सलग आठव्या वर्षी कररचना जैसे थेच!

Union Budget 2022 Live Updates: करदात्यांची मोठी निराशा; सलग आठव्या वर्षी कररचना जैसे थेच!

googlenewsNext

मुंबई: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प (Union Budget 2022) सादर केला. वाढती महागाई, बेरोजगारांची वाढलेली संख्या, खनिज तेलाचे वाढत असलेले दर अशा पार्श्वभूमीवर सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडला. कर रचनेत बदल करून सरकार काहीशी सवलत देईल अशी आशा नोकरदार वर्गाला होती. मात्र टॅक्स स्लॅब कोणताही बदल न करत सरकारनं मध्यमवर्गीयांना धक्का दिला. २०१४ नंतर टॅक्स स्लॅबमध्ये बदल झाला नसल्यानं यंदा तरी करात सवलत मिळेल अशी आशा मध्यम वर्गाला होती. मात्र ती फोल ठरली. दुसऱ्या बाजूला कॉर्पोरेट, सहकार क्षेत्राचा कर १८ टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर आणण्यात आला. क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना सरकारनं मोठा धक्का दिला आहे. आरबीआय २०२२-२३ मध्ये डिजिटल चलन आणेल. डिजिटल चलनात गुंतवणूक करणाऱ्यांना ३० टक्के कर भरावा लागेल, अशी घोषणा सीतारामन यांनी केली.

LIVE

Get Latest Updates

12:33 PM

करचुकवेगिरी करणाऱ्यांना मोठा दणका बसणार

करचुकवेगिरी करणाऱ्यांना मोठा दणका; छापा मारल्यास संपूर्ण संपत्ती जमा होणार

12:28 PM

खाद्य तेलाचे दर कमी करण्यासाठी प्रयत्न

तेलबिया आयात कमी करण्याचा प्रयत्न. तेलबिया उत्पादन वाढवण्यावर सरकारचा भर. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणार- अर्थमंत्री

12:28 PM

करदात्यांची मोठी निराशा! सलग आठव्या वर्षी आयकरात कोणत्याही प्रकारचा बदल नाही

सलग आठव्या वर्षी आयकरात कोणत्याही प्रकारचा बदल नाही; कर रचना जैसे थे!

12:23 PM

जीएसटीमधून वाढता महसूल

कोरोना संकट काळातही जीएसटीमधून मोठा महसूल. जानेवारी २०२२ मध्ये १ लाख ४० हजार कोटींचा जीएसटी मिळाला- अर्थमंत्री

12:18 PM

क्रिप्टोच्या उत्पन्नावर ३० टक्के कर

क्रिप्टोच्या उत्पन्नावर ३० टक्के कर लागणार. २०२२-२३ मध्ये आरबीआय आणणार डिजिटल चलन- अर्थमंत्री

12:17 PM

को-ऑपरेटिव्ह सोसायट्यांसाठी कर कपात

को-ऑपरेटिव्ह सोसायट्यांचा कर १८ टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर. सरचार्ज १२ टक्क्यांवरून ७ टक्के करण्याचा प्रस्ताव- अर्थमंत्री

12:15 PM

आता करदात्यांना आपले रिटर्न अपडेट करता येणार

आयकर भरल्यानंतर अनेकदा करदात्यांना काही चुका लक्षात येतात. आकडे चुकलेले असतात. उत्पन्नाची माहिती भरणं चुकून राहून जातं. अशा स्थितीत रिटर्न अपडेट करता येणार- अर्थमंत्री

12:13 PM

कॉर्पोरेट क्षेत्रासाठी मोठी घोषणा

कॉर्पोरेट कर १८ टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर, स्टार्ट अप्ससाठी असलेली कर सवलत एका वर्षानं वाढवली

12:10 PM

सहकार क्षेत्राला मोठा दिलासा

सहकार क्षेत्राला भराव्या लागणाऱ्या करात कपात; कर १८ टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर

12:04 PM

आरबीआय आणणार डिजिटल चलन

२०२२-२३ मध्ये आरबीआय डिजिटल चलन आणणार- अर्थमंत्री

12:02 PM

७५ जिल्ह्यांमध्ये ७५ डिजिटल बँका सुरू होणार

देशातील ७५ जिल्ह्यांमध्ये ७५ डिजिटल बँका सुरू करणार. या बँका व्यवसायिक बँका स्थापन करणार. यामुळे डिजिटल पेमेंट्सना प्रोत्साहन मिळणार. देशातील सर्व पोस्ट ऑफिसेसना बँकिग सिस्टिमशी जोडण्यात येणार- अर्थमंत्री

11:59 AM

पासपोर्ट प्रक्रिया सुलभ होणार

नागरिकांच्या सोयीसाठी २०२२-२३ मध्ये ई-पासपोर्ट जारी करण्यात येणार. पासपोर्ट मिळवताना येणाऱ्या अडचणी दूर करून प्रक्रिया सोपी करण्याचा सरकारचा प्रयत्न- अर्थमंत्री

 

11:57 AM

याचवर्षी देशात येणार ५ जी

२०२२ मध्ये देशात ५ जी सेवा सुरू होणार. टेलिकॉम क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होणार- अर्थमंत्री

11:55 AM

पोस्ट ऑफिसेस हायटेक होणार

२०२२च्या अखेरपर्यंत पोस्ट ऑफिसेसमध्ये बँकिंगशी संबंधित सर्व सुविधा मिळणार- अर्थमंत्री

11:51 AM

सौरउर्जेच्या निर्मितीसाठी अनेक प्रकल्पांची घोषणा

पर्यावरणपूरक विकासावर भर. कार्बन उत्सर्जन कमी करण्याकडे लक्ष. सौरउर्जेच्या निर्मितीसाठी अनेक प्रकल्प सुरू करणार- अर्थमंत्री

11:49 AM

संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर भारत

संरक्षणासाठी असलेल्या बजेटमधील २५ टक्के रक्कम संशोधन आणि विकासासाठी वापरणार. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यावर भर- अर्थमंत्री

11:46 AM

किसान ड्रोन्सचा वापर करणार

पिकांच्या मूल्यांकनासाठी, जमिनीच्या डिजिटल नोंदणीसाठी, किटक नाशकांच्या फवारणीसाठी किसान ड्रोन्सचा वापर करणार- अर्थमंत्री

11:41 AM

ईलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्सऐवजी बॅटरी स्वॅपिंग

मोठ्या शहरांमध्ये मोकळ्या जागांचा असलेला अभाव पाहता ईलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्सऐवजी बॅटरी स्वॅपिंग धोरण राबवणार- अर्थमंत्री

11:40 AM

ईशान्य भारतासाठी १५०० कोटी रुपये

ईशान्य भारतासाठी १५०० कोटी रुपयांची तरतूद- अर्थमंत्री

11:37 AM

राष्ट्रीय महामार्गांबद्दल मोठी घोषणा

लोकांच्या, मालाच्या वेगवान वाहतुकीसाठी राष्ट्रीय महामार्गांचं जाळं वाढवणार. २०२२-२३ मध्ये राष्ट्रीय महामार्ग २५ हजार किमीनं वाढवणार. त्यासाठी २० हजार कोटींची तरतूद- अर्थमंत्री

11:33 AM

व्हायब्रंट व्हिलेज योजनेची घोषणा

सीमेवरील गावांचा विकास करण्यासाठी व्हायब्रंट व्हिलेज योजना सुरू करणार. योजनेला गरजेनुसार निधी पुरवणार- अर्थमंत्री

11:30 AM

पंतप्रधान आवास योजनेसाठी मोठी घोषणा

पंतप्रधान आवास योजनेसाठी ४८ लाख कोटींची तरतूद; ग्रामीण आणि शहरी भागांत गरिबांसाठी घरं उभारणार. परवडणाऱ्या घरांसाठी खासगी विकासकांशी चर्चा करणार- अर्थमंत्री

11:26 AM

शालेय शिक्षणासंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा

शालेय शिक्षणासाठी १०० चॅनेल्स सुरू करणार. विद्यार्थ्यांना स्थानिक भाषेत शिकवणार. रेडिओ, टीव्हीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणार- अर्थमंत्री

11:24 AM

मध्यम आणि लघु उद्योजकांसाठी मोठी घोषणा

मध्यम आणि लघु उद्योजकांसाठी २ लाख कोटींचं अर्थसहाय्य; राष्ट्रीय कौशल्य योजनेमधून रोजगार निर्मिती करणार, त्यांना प्रशिक्षण देणार- अर्थमंत्री

11:21 AM

शेतीसाठी मोदी सरकारच्या घोषणा

कृषी क्षेत्रासाठी काम करणाऱ्या स्टार्ट अप्सना नाबार्डच्या माध्यमातून मदत करणार. सेंद्रिय, शून्य बजेट शेतीला चालना देणार. ९ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणणार- अर्थमंत्री

11:18 AM

वंदे भारत ट्रेन्ससंदर्भात मोठी घोषणा

पुढील ३ वर्षांत ४०० न्यू जनरेशन वंदे भारत ट्रेन्स सुरू करणार. पुढच्या ३ वर्षांत १०० पीएम गती शक्ती कार्गो टर्मिनल्स उभारणार- अर्थमंत्री

11:15 AM

स्थानिक व्यापार वाढीकडे विशेष लक्ष

स्थानिक व्यापाराला चालना देण्यासाठी योग्य व्यवस्था उभारणार. उद्योगधंद्यांसाठी वन विंडो प्लॅटफॉर्म सुरू करणार- अर्थमंत्री

11:10 AM

अर्थमंत्र्यांकडून पीएम गती शक्ती योजनेची घोषणा

पीएम गती शक्ती योजनेच्या माध्यमातून पायाभूत सुविधेसाठी मोठी गुंतवणूक करणार. रस्ते, रेल्वे, हवाई, जल वाहतुकीसाठी गुंतवणूक केली जाणार. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारण्यावर भर- अर्थमंत्री

11:07 AM

देशाची अर्थव्यवस्था ९.२७ टक्के वेगानं वाढणार- अर्थमंत्री सीतारामन



 

11:03 AM

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली



 

10:39 AM

अर्थसंकल्पाला कॅबिनेटच्या बैठकीत मंजुरी



 

10:31 AM

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी संसदेत पोहोचले



 

10:24 AM

पंतप्रधान मोदी संसदेत पोहोचले; अर्थमंत्री सीतारामन ११ वाजता सादर करणार अर्थसंकल्प



 

10:09 AM

अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत पोहोचल्या; थोड्याच वेळात मांडणार अर्थसंकल्प



 

10:08 AM

अर्थसंकल्पाच्या प्रती असलेला ट्रक संसदेच्या बाहेर पोहोचला



 

09:45 AM

अर्थमंत्री निर्मला सीतारामन राष्ट्रपती भवनात; सोबत अर्थराज्यमंत्री भागवत कराड, पंकज चौधरी आणि अर्थ मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी



 

09:40 AM

अर्थमंत्री सीतारामन यांचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक; सगळ्या क्षेत्रांना मदत मिळणार- अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी



 

09:34 AM

अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात उसळी; सेन्सेक्स ५८२.८५ अंकांनी वर; सध्या ५८,५९२ अंकांवर; निफ्टीत १५६.२० अंकांची वाढ; सध्या १७,४९६ अंकांवर 



 

09:22 AM

अर्थमंत्री निर्मला सीतारामन राष्ट्रपती भवनात पोहोचल्या



 

09:14 AM

अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थ मंत्रालयातून निघाल्या; पारंपारिक वही खात्याऐवजी टॅबमधून वाचून दाखवणार बजेट



 

09:05 AM

अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थ मंत्रालयात पोहोचल्या; ११ वाजता मांडणार देशाचा अर्थसंकल्प



 

08:58 AM

अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, पंकज चौधरी अर्थ मंत्रालयात पोहोचले



 

08:54 AM

अर्थ राज्यमंत्री भागवत कराड दिल्लीतील निवासस्थानातून रवाना

पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली देशातील सर्व क्षेत्रांच्या भावना लक्षात घेऊन एक सर्वसमावेश अर्थसंकल्प सादर होणार आहे. यामुळे देशाचं लोकांचं निश्चितपणे कल्याण होऊन देश पुढे जाईल- अर्थ राज्यमंत्री भागवत कराड

08:49 AM

अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी केली पूजा

08:37 AM

घोषणा शेतकऱ्यांसाठी, लक्ष्य उत्तर प्रदेश निवडणूक?

अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. पीएम किसान सन्मान निधीत वाढ अपेक्षित आहे. पीएम किसान सन्मान निधी ६ हजाराहून अधिक केल्यास केवळ शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाही, तर ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल, असं कृषी क्षेत्राचे जाणकार सांगतात. शेतकरी आंदोलनाचा मोठा फटका भाजपला उत्तर प्रदेशात बसू शकतो. पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांचा आंदोलनात सहभाग होता. त्यांची संख्या लक्षणीय होती. त्यामुळे या वर्गाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सरकारकडून अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केला जाऊ शकतो.

08:23 AM

करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेत वाढ होणार?

सध्याच्या घडीला ३ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त; २०१४ नंतर करमुक्त उत्पन्नात वाढ झालेली नाही. सीतारामन करमुक्त उत्पन्नाची मर्यादा ३.५ लाखांपर्यंत वाढवण्याची शक्यता.

08:10 AM

बूस्टर डोससाठी निधीची घोषणा होण्याची शक्यता

कोरोना प्रतिबंधात्मक बूस्टर डोससाठी निधीची तरतूद जाहीर होण्याची शक्यता

07:59 AM

रेल्वे संदर्भात काय घोषणा होणार?

गेल्या वर्षी स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात बोलताना पंतप्रधान मोदींनी ७५ शहरं जोडण्यासाठी वंदे भारत ट्रेन्स चालवण्याची घोषणा केली होती. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना रेल्वेसाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता 

07:47 AM

शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा होणार?

पाच राज्यांमध्ये होत असलेल्या निवडणुका पाहता शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा अपेक्षित; शेतकरी आंदोलनाचा फटका बसू नये म्हणून सरकार प्रयत्नशील

07:36 AM

आरोग्य, शिक्षणासाठीची तरतूद वाढणार का?

कोरोना संकटामुळे आरोग्य यंत्रणा, त्यासाठी लागणाऱ्या सोयी सुविधा यांचं महत्त्व अधोरेखित; अप्थमंत्री आरोग्य क्षेत्रासाठी अधिक निधी देणार का? शिक्षणावरील खर्च वाढणार का?

07:33 AM

अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना काय मिळणार?

कोरोनाचा फटका बसलेल्या नोकरदार, व्यवसायिक वर्गाला काय मिळणार याकडे देशाचं लक्ष; करदात्यांसाठी सवलतींची घोषणा अपेक्षित

Web Title: Union Budget 2022 Live Updates india Finance Minister Nirmala Sitharaman at parliament 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.