Union Budget 2022 : राज्यांच्या अर्थव्यवस्थेसाठी 1 लाख कोटींचे पॅकेज, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 12:26 PM2022-02-01T12:26:55+5:302022-02-01T12:31:42+5:30

Union Budget 2022 : सहकार क्षेत्राला भरावा लागणारा कर 18 टक्क्यांनुसार 15 टक्क्यावंर आणण्यात आला आहे.

Union Budget 2022: Rs 1 lakh crore package for state economy, announced by Finance Minister Nirmala Sitharaman | Union Budget 2022 : राज्यांच्या अर्थव्यवस्थेसाठी 1 लाख कोटींचे पॅकेज, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची घोषणा

Union Budget 2022 : राज्यांच्या अर्थव्यवस्थेसाठी 1 लाख कोटींचे पॅकेज, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची घोषणा

Next

नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प (Union Budget 2022) सादर करत आहेत. या अर्थसंकल्पात त्यांनी राज्यांना मोठा दिलासा दिला आहे. निर्मला सीतारमण यांनी देशातील सर्व राज्यांच्या अर्थव्यवस्थेसाठी 1 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली आहे.

राज्यांच्या भांडवली गुंतवणुकीसाठी केंद्र सरकार सहकार्य करणार असून मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांच्या बैठकीत भांडवली गुंतवणूकीची मर्यादा वाढवण्याची मागणी राज्यांकडून करण्यात आली. राज्यांच्या अर्थव्यवस्थेसाठी 1 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली असून गती शक्ती योजना, ग्रामीण विकासासाठी निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती सीतारमण यांनी दिली आहे.

सहकार क्षेत्राला दिलासा
यावेळी निर्मला सीतारमण यांनी सांगितल्यानुसार, सहकार क्षेत्राला भरावा लागणारा कर 18 टक्क्यांनुसार 15 टक्क्यावंर आणण्यात आला आहे. तसेच, को-ऑपरेटिव्ह सोसीयटी ज्यांचे उत्पन्न 1 ते 10 कोटी आहे त्यांचा कर 12 टक्क्यांपासून 7 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. याशिवाय, सरकारने भांडवली खर्च 35.4 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे. हा जीडीपीच्या 2.9 टक्के असेल.

Web Title: Union Budget 2022: Rs 1 lakh crore package for state economy, announced by Finance Minister Nirmala Sitharaman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.