Union Budget 2022 Sports sector : आशिया व राष्ट्रकुल स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून क्रीडा विभागासाठी ३०० कोटींचा बूस्ट; एकूण ३०६२ कोटींचा बजेट सादर 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 02:25 PM2022-02-01T14:25:33+5:302022-02-01T14:26:12+5:30

Union Budget 2022 Sports sector : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी  मंगळवारी 2022-23 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला.

Union Budget 2022- Sports sector gets Rs 300 Crore boost, total budget allocated Rs 3062.60 Cr ahead of Asian Games and Commonwealth Games | Union Budget 2022 Sports sector : आशिया व राष्ट्रकुल स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून क्रीडा विभागासाठी ३०० कोटींचा बूस्ट; एकूण ३०६२ कोटींचा बजेट सादर 

Union Budget 2022 Sports sector : आशिया व राष्ट्रकुल स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून क्रीडा विभागासाठी ३०० कोटींचा बूस्ट; एकूण ३०६२ कोटींचा बजेट सादर 

Next

Union Budget 2022 Sports sector : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी  मंगळवारी 2022-23 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. सीतारामन यांनी सादर केलेल्या बजेटमध्ये क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी ३०६२.६० कोटींचा बजेट सादर केला. आगामी आशियाई स्पर्धा व राष्ट्रकुल स्पर्धा डोळ्यासमोर ठेऊन मागच्या तुलनेत ३०० कोटी वाढ यंदाच्या बजेटमध्ये क्रीडा क्षेत्रासाठी करण्यात आली आहे. खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यानं फार मदत मिळणार आहे.  

सीतारामन यांनी देशातील पायाभूत सुविधांसाठी यावेळी मोठ्या घोषणा केल्या. यंदाच्या अर्थसंकल्पात २०४७ पर्यंतची रुपरेषा असल्याचं सांगत 'पीएम गतिशक्ती योजने'च्या 'मास्टर प्लान'वर सरकार काम करत असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. गतिशक्ती योजनेअंतर्गत रस्ते, रेल्वे, जलवाहतुकीसाठी येत्या काळात मोठी गुंतवणूक केली जाणार आहे. पण देशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासात राज्य सरकारांनी देखील पुढाकार घेऊन सहभाग घेणं आवश्यक असल्याचंही सीतारामण म्हणाल्या.  

अर्थसंकल्पामध्ये फिनटेस आणि डिजिटलायझेशनवर भर देण्यात आला आहे. एटीएम, नेटबँकिंग, पेमेंट अॅप्सद्वारे टपाल बचत इंटरऑपरेबल करून ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण लोकांची सोय केली जाणार आहे. RuPay आणि UPI द्वारे एमडीआर फीमध्ये सबसिडी देण्याचा निर्णय एक सकारात्मक पाऊल असल्याचे सांगण्यात येत आहे. नागरिकांच्या सोयीसाठी २०२२-२३ मध्ये ई-पासपोर्ट जारी करण्यात येणार आहे पासपोर्ट मिळवताना येणाऱ्या अडचणी दूर करून प्रक्रिया सोपी करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. तसेच २०२२च्या अखेरपर्यंत पोस्ट ऑफिसेसमध्ये बँकिंगशी संबंधित सर्व सुविधा मिळणार आहे. २०२२ मध्ये देशात ५ जी सेवा सुरू होणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी जाहीर केले आहे. 

Web Title: Union Budget 2022- Sports sector gets Rs 300 Crore boost, total budget allocated Rs 3062.60 Cr ahead of Asian Games and Commonwealth Games

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.