Union Budget 2022: मध्यमवर्गीयांना करात दिलासा का नाही?; महाभारतातील ‘या’ श्लोकमध्ये दडलंय उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 03:59 PM2022-02-01T15:59:40+5:302022-02-01T17:01:21+5:30

महाभारताच्या शांती पर्वच्या अध्याय ७२ मधील श्लोक ११ वाचून दाखवत निर्मला सीतारामन यांनी त्यांचे बोलणं समजावलं.

Union Budget 2022: Why no tax relief for middle class?; The answer is hidden in the verse of Mahabharata | Union Budget 2022: मध्यमवर्गीयांना करात दिलासा का नाही?; महाभारतातील ‘या’ श्लोकमध्ये दडलंय उत्तर

Union Budget 2022: मध्यमवर्गीयांना करात दिलासा का नाही?; महाभारतातील ‘या’ श्लोकमध्ये दडलंय उत्तर

Next

नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या बजेटमध्ये देशातील मध्यमवर्गीय कुटुंबीयांना मागील ८ वर्षांपासून टॅक्स स्लॅबमध्ये बदल होण्याची आशा ठेवून बसले होते. परंतु यंदाही आयकरात काही बदल न केल्यानं नोकरदारवर्गाची निराशा झाली. अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मध्यमवर्गीयांना टॅक्समध्ये दिलासा का नाही याबाबत सांगितले.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन(Niramala Sitharam) महाभारतातील एका श्लोकचं उदाहरण देत सांगितले की,  राजाने कोणताही हलगर्जीपणा न करता आणि धर्मानुसार कर वसूल करावा. मी या देशातील करदात्यांचे आभार मानते कारण गरज असताना त्यांनी सरकारच्या हातांना मजबूत केले आहे. करदात्यांनी सरकारला नेहमी साथ दिली आहे.

महाभारताच्या शांती पर्वच्या अध्याय ७२ मधील श्लोक ११ वाचून दाखवत निर्मला सीतारामन यांनी त्यांचे बोलणं समजावलं. दापयित्वाकरंधर्म्यंराष्ट्रंनित्यंयथाविधि। अशेषान्कल्पयेद्राजायोगक्षेमानतन्द्रितः॥११॥ याचा अर्थ असा आहे की, राजाने कोणताही हलगर्जीपणा न करता आणि धर्मानुसार कर वसूल करावा. राजाने प्रजेच्या कल्याणाची व्यवस्था राजधर्माप्रमाणे, शिथिलता न ठेवता आणि धर्मानुसार कर वसूल करून केली पाहिजे. निर्मला सीतारामन म्हणाल्या की, आपल्या प्राचीन ग्रंथातून ज्ञान आणि मार्गदर्शन घेऊन आपण प्रगतीच्या मार्गावर चालत आलो आहोत. या अर्थसंकल्पातील प्रस्तावांमध्ये अधिक सुधारणा घडवून आणण्याचे उद्दिष्ट आहे. जे आमच्या स्थिर आणि प्रचलित कर प्रणालीच्या धोरणाच्या अनुषंगाने विश्वासार्ह कर व्यवस्था स्थापन करण्याच्या आमच्या दृष्टीकोनात पुढे जाऊ शकतो. यामुळे कर प्रणाली आणखी सुलभ होईल असं त्यांनी सांगितले.

गरीबांचं कल्याण अन् तरुणाईचं उज्ज्वल भविष्य निश्चित करणारा अर्थसंकल्प

विकासाचा नवा विश्वास घेऊन आलेला हा अर्थसंकल्प आहे. अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासोबतच सर्वसामान्य नागरिकांना अनेक संधी उपलब्ध करुन देणार हा अर्थसंकल्प आहे. यंदांचे बजेट more Infrastructure, More Investment, More Growth, आणि More Jobs च्या संभाव्यतेनं भरलेला बजेट आहे. त्यामुळे, ग्रीन जॉब्सच्याही संधी निर्माण होतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले. मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन संसदेत सादर झालेल्या अर्थसंकल्पाचे स्वागत करत देशवासीयांना संबोधित केले.

Web Title: Union Budget 2022: Why no tax relief for middle class?; The answer is hidden in the verse of Mahabharata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.