1 कोटी तरुणांसाठी खुशखबरी, टॉप कंपन्यांमध्ये मिळणार प्रशिक्षण अन् महिना 5000 रुपये...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 06:46 PM2024-07-23T18:46:36+5:302024-07-23T18:47:06+5:30
Union Budget 2024: या योजनेअंतर्गत पाच वर्षांत देशातील टॉप कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे.
Union Budget 2024 : आज केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर झाला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्पातून कौशल्य विकास प्रशिक्षणादरम्यान तरुणांना पैसे कमविण्याचा मार्गही मोकळा करुन दिला आहे. योजनेअंतर्गत देशातील टॉप कंपन्यांमध्ये कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल आणि 12 महिन्यांच्या पंतप्रधान इंटर्नशिप दरम्यान तरुणांना 5000 रुपये भत्तादेखील मिळेल. यापूर्वी ज्यांनी कधीच नोकरी केलेली नाही किंवा शिक्षण पूर्ण केले नाही, अशा तरुणांसाठीच ही योजना असेल.
टॉप कंपन्यांमध्ये इंटर्नशिप कशी मिळवायची?
पाच वर्षांत भारतातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये एक कोटी तरुणांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. ही 5000 रुपये मासिक भत्त्यासह 12 महिन्यांची पंतप्रधान इंटर्नशिप असेल. हे फक्त त्या व्यक्तींना लागू होईल, ज्यांनी कधीच नोकरी केली नाही किंवा जे पूर्णवेळ शिक्षण घेत नाहीत. 21 ते 24 वर्षे वयोगटातील तरुण या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
अर्ज कसा कराल?
या योजनेत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन पोर्टलद्वारे अर्ज करता येईल. काही निकषांच्या आधारे निवड केली जाईल आणि या निवडीमध्ये ज्यांच्याकडे रोजगार मिळवण्याची क्षमता कमी आहे, अशा तरुणांवर भर दिला जाईल.
इंटर्नशिपसाठी कोण अर्ज करू शकतो
यामध्ये उमेदवाराची IIT, IIM, IISER, CA, CMA इत्यादी पात्रता असावी. उमेदवाराच्या कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर निर्धारक असावा. उमेदवाराच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी असावा.