केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीलाच,राष्ट्रपतींची मंजुरी

By admin | Published: January 8, 2017 10:21 AM2017-01-08T10:21:55+5:302017-01-08T10:21:55+5:30

केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीलाच मांडला जाणार आहे. रेल्वे बजेटचाही यावर्षीपासून याच अर्थसंकल्पामध्ये समावेश

Union budget approval on President Pranab Mukherjee | केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीलाच,राष्ट्रपतींची मंजुरी

केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीलाच,राष्ट्रपतींची मंजुरी

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 8 - केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीलाच मांडला जाणार आहे. रेल्वे बजेटचाही  यावर्षीपासून याच अर्थसंकल्पामध्ये समावेश करण्यात येणार आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी यावर शिक्कामोर्तब केलं आहे.     

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर व गोवा या पाच राज्यांच्या निवडणुकांच्या अखेरच्या टप्प्यातील मतदान ८ मार्चला होणार आहे. या  पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या आधी अर्थसंकल्प सादर  करून सरकार  मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करेल, असा आक्षेप विरोधकांनी घेतला होता.
 
विरोधी पक्षांनी केलेल्या तक्रारींची दखल घेऊन निवडणूक आयोगाने त्याबाबत केंद्र सरकारला विचारणा केली होती. मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी मंत्रिमंडळ सचिव पी.के. सिन्हा यांना या संदर्भात पत्र पाठवून 10 जानेवारीपर्यंत त्यावर उत्तर देण्यास सांगितलं होतं मात्र, आता राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर 1 फेब्रुवारीलाच अर्थसंकल्प सादर होईल, यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
 
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा 31 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या काळात होईल. तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा 9 फेब्रुवारी ते 12 एप्रिल या काळात होईल.अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यातच अर्थसंकल्प सादर केला जाईल.राष्ट्रपती दोन्ही सभागृहांना संयुक्तरित्या संबोधित करुन अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात करतील.

Web Title: Union budget approval on President Pranab Mukherjee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.