Union Cabinet Decisions: शेतकरी, फेरीवाले, वीज निर्मिती...! मोदी मंत्रिमंडळाने घेतले पाच मोठे निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 05:20 PM2022-04-27T17:20:31+5:302022-04-27T17:21:13+5:30
Union Cabinet Decisions मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या वादळी बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाने आज पाच मोठे निर्णय घेतले आहेत.
मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या वादळी बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाने आज पाच मोठे निर्णय घेतले आहेत. यामध्ये शेतकरी, जम्मूमध्ये वीजनिर्मिती केंद्र, फेरीवाले, नक्षलग्रस्त आणि पोस्टाच्या बँकेबाबत हे निर्णय घेण्यात आले आहेत.
जम्मू काश्मीरमध्ये चिनाब नदीवरील 540 MW च्या क्वार हायड्रो पॉवर प्रकल्पाची निर्मिती करण्यात येणार आहे. या प्रकल्पातून 1975 दशलक्ष युनिट वीज निर्मिती केली जाणार आहे. यामुळे जम्मू काश्मीर विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनणार आहे. दुसऱ्या निर्णयात पंतप्रधान स्वनिधी योजनेचा कालावधी वाढविण्यात आला आहे. फेरीवाल्यांना देण्यात येणारा निधी २०२४ पर्यंत दिला जाणार आहे.
तिसरा मोठा निर्णय हा शेतकऱ्यांसाठी घेण्यात आला आहे. रासायनिक खतांवर भरघोस अनुदानाची घोषणा करण्यात आली आहे. वाढत्या महागाईचा फटका खतांच्या किंमतीवर पडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. चौथा निर्णय हा नक्षलग्रस्त भागातील दूरसंचार सेवेबाबत आहे. १० राज्यांतील नक्षलग्रस्त भागातील जवळपास 2542 मोबाईल टॉवर टूजी वरून ४जी लेस केले जाणार आहेत. यासाठी मोदींनी 2426 रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
Union Cabinet has approved the construction of the 540 MW Kwar Hydro Electric project on the Chenab river in Kishtwar. This project will generate 1975 million units of electricity and it will be commissioned in 54 months.
— ANI (@ANI) April 27, 2022
पाचवा निर्णय हा पोस्ट ऑफिसच्या पोस्ट पेमेंट बँकेबाबत आहे. ग्रामीण भागात बँकिंग सुविधा मिळण्यासाठी तसेच तेथील महिलांना मोठ्या प्रमाणावर बँकेशी जोडले जावे या उद्देशाने या बँकेचा विस्तार केला जाणार आहे.