केंद्रीय मंत्रिमंडळाचे आठ गटांत विभाजन, पारदर्शकता वाढविणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 06:22 AM2021-11-16T06:22:38+5:302021-11-16T06:23:15+5:30
कामकाजातील पारदर्शकता वाढविणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर कामकाजाची गती वाढण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मंत्रिमंडळातील ७७ मंत्र्यांना आठ गटांत विभाजित करण्यात आले आहे.
सरकारच्या कामकाजात पारदर्शकता वाढविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या पाच बैठकांनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या चिंतन शिबिरांच्या अध्यक्षस्थानी स्वत: पंतप्रधान मोदी होते. केंद्र सरकारच्या योजना प्रभावीपणे राबविणे हा या बैठकांचा हेतू होता. पाचव्या आणि अखेरच्या बैठकीत संसदीय कामकाज या विषयावर चर्चा झाली. यामध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू हेही उपस्थित होते.
अशी असेल रचना
n मंत्र्यांच्या आठ वेगवेगळ्या गटात प्रत्येकी ९ ते १० मंत्री असतील. एका केंद्रीय मंत्र्याला समूह समन्वयक बनविण्यात येईल.
n या सदस्यांची आपापसांत चर्चा होईल. प्रथमच
मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या मंत्र्यांना यामुळे अधिक फायदा होऊ शकेल.
n पंतप्रधान मोदी यांनी गुजरातच्या धर्तीवर टिफीन बैठका घेण्याची सूचनाही केली आहे.
n यामध्ये मंत्री आणि नेते आपापल्या घरून टिफीन घेऊन येतील आणि सहभोजन घेतानाच पक्षाच्या कामावर चर्चा करतील.