केंद्रीय कॅबिनेटची उद्या बैठक, जम्मू-काश्मीरला मिळणार मोठं गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 08:14 PM2019-08-27T20:14:47+5:302019-08-27T20:15:09+5:30

केंद्रीय कॅबिनेटची बुधवारी एक विशेष बैठक होणार आहे.

union cabinet to hold a meeting tomorrow big announcement for jammu and kashmir | केंद्रीय कॅबिनेटची उद्या बैठक, जम्मू-काश्मीरला मिळणार मोठं गिफ्ट

केंद्रीय कॅबिनेटची उद्या बैठक, जम्मू-काश्मीरला मिळणार मोठं गिफ्ट

Next

नवी दिल्लीः केंद्रीय कॅबिनेटची बुधवारी एक विशेष बैठक होणार आहे. या बैठकीत केंद्र सरकार जम्मू-काश्मीरला मोठं गिफ्ट देऊ शकते. तत्पूर्वी मंगळवारी केंद्रीय गृह सचिव ए. के. भल्ला यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक झाली आहे. या बैठकीत जम्मू-काश्मीरमधल्या परिस्थितीवर चर्चा करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूत्रांनुसार, या बैठकीत वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी सहभागी होते. या बैठकीत जम्मू-काश्मीरमध्ये केंद्र सरकारच्या योजनांना कार्यान्वित करण्यासंबंधी चर्चा करण्यात आली आहे. तसेच राज्यात सामान्य स्थिती आणण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्यात येणार आहेत. 

केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जम्मू-काश्मीरला दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजित केलं आहे. आता ही प्रक्रिया पुढे नेण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या वाटपावरही चर्चा करण्यात येणार आहे. बैठकीचं अध्यक्ष स्थान केंद्रीय गृहसचिव भल्ला यांनी भूषवलं आहे.  

31 ऑक्टोबरला अस्तित्वात आले दोन केंद्रशासित प्रदेश
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती शासन सुरू आहे. त्यासाठी अधिनियम लागू करण्याची जबाबदारी केंद्र सरकारवर आहे. केंद्रीय वित्त, कृषी आणि ग्रामीण विकास, उद्योगासहीत मोठी मंत्रालयं आणि विभागातील 15हून अधिक सचिव बैठकीत उपस्थित होते.  विकास कार्यक्रम आणि संपत्ती, कर्मचाऱ्यांच्या वाटपावर चर्चा केली जाणार आहे. 

काही टीमनं केला श्रीनगरचा दौरा
केंद्र सरकारनं अधिकाऱ्यांच्या काही टीम श्रीनगरचा दौरा करून झाल्या आहेत. तर संयुक्त सचिव आणि सचिवस्तरावरील काही टीम आगामी आठवड्यात काश्मीरचा दौरा करणार आहेत. राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी घोषणा केलेल्या 85 विकास योजनांना राबवण्यासाठी जम्मू-काश्मीर प्रशासन मदत करणार आहे. 

तीन समित्याचं झालं गठन
जम्मू-काश्मीरच्या प्रशासनानं राज्याच्या विभाजनावर काम करण्यासाठी तीन समित्या गठीत केल्या आहेत. या तिन्ही समित्या जम्मू-काश्मीरच्या विकासावर काम करत आहेत. तिन्ही समित्यांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या असून, त्यानुसार त्या समित्या काम करत आहेत. 

Web Title: union cabinet to hold a meeting tomorrow big announcement for jammu and kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.