आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी; जाणून घ्या, कोठे खर्च होणार 64 हजार कोटी?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 03:43 PM2021-09-15T15:43:09+5:302021-09-15T15:44:32+5:30
atmanirbhar swasth bharat yojana : या आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेअंतर्गत देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये आणि 3,382 ब्लॉकमध्ये एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांची स्थापना केली जाईल.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेला (Atmanirbhar Swasth Bharat Yojana) केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली आहे. ही योजना जवळपास 64 हजार कोटी रुपयांची आहे. याबाबतची माहिती बुधवारी सूत्रांनी दिली आहे. या आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेअंतर्गत देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये आणि 3,382 ब्लॉकमध्ये एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांची स्थापना केली जाईल.
आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेची घोषणा आर्थिक वर्ष 21-22 च्या अर्थसंकल्पीय भाषणात सहा वर्षांच्या (आर्थिक वर्ष 25-26 पर्यंत) सुमारे 64,180 कोटी रुपयांच्या खर्चासह करण्यात आली. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हे राष्ट्रीय आरोग्य अभियाना व्यतिरिक्त असणार आहे.
ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने भारतीय लोकांवर लसीच्या चाचणीला ग्रीन सिग्नल दिला आहे. #DCGI#coronavirus#coronavaccationhttps://t.co/lLwh4dbVyg
— Lokmat (@MiLOKMAT) September 15, 2021
योजनेची ठळक वैशिष्ट्ये-
1) हाय फोकस 10 राज्यांमध्ये 17,788 ग्रामीण आरोग्य आणि कल्याण केंद्रांसाठी सहाय्यता.
2) सर्व राज्यांमध्ये 11,024 शहरी आरोग्य आणि कल्याण केंद्रांची स्थापना.
3) सर्व जिल्ह्यांमध्ये एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांची स्थापना आणि 11 हाय फोकस राज्यांमध्ये 3382 ब्लॉक सार्वजनिक आरोग्य युनिट्स.
4) 602 जिल्हे आणि 12 केंद्रीय संस्थांमध्ये क्रिटिकल केअर हॉस्पिटल ब्लॉकची स्थापना.
5) नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (एनसीडीसी), त्याच्या 5 प्रादेशिक शाखा आणि 20 महानगर आरोग्य देखरेख युनिट्स मजबूत करणे.
6) सर्व सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांना जोडण्यासाठी सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकात्मिक आरोग्य माहिती पोर्टलचा विस्तार.
7) 17 नवीन सार्वजनिक आरोग्य युनिट्सचे संचालन आणि 33 विद्यमान सार्वजनिक आरोग्य युनिट्स मजबूत करणे, जे 32 विमानतळ, 11 बंदरे आणि 7 लँड क्रॉसिंगवर आहेत.
8) 15 आरोग्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्रे आणि 2 मोबाईल हॉस्पिटलची स्थापना.
केंद्रीय मंत्रिमंडळ येत्या काही आठवड्यांत यासंबंधीची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. #coronavirus#PMCaresForChildren https://t.co/rzrL7c5VIa
— Lokmat (@MiLOKMAT) September 15, 2021