केंद्रीय मंत्रिमंडळाचं खातेवाटप- जावडेकरांना केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री, तर आठवलेंना.....
By admin | Published: July 5, 2016 10:09 PM2016-07-05T22:09:19+5:302016-07-05T22:30:45+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाच्या विस्तार झाला असून, आता खातेवाटपही जाहीर करण्यात आलं आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 05 - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाच्या विस्तार झाला असून, आता खातेवाटपही जाहीर करण्यात आलं आहे. 19 नव्या मंत्र्यांना खातेवाटप जाहीर करताना काही जुन्या मंत्र्यांचा खांदेपालट करण्यात आला आहे. अनेक आघाड्यांवर वादग्रस्त ठरलेल्या स्मृती इराणींकडचं केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्रिपदाचं खातं काढून ते पुण्याच्या प्रकाश जावडेकरांकडे सोपवण्यात आलं आहे. प्रकाश जावडेकरांच्या पर्यावरण खात्याचा कार्यभार अनिल माधव दवे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तर स्मृती इराणींना केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रिपद देण्यात आलं आहे. व्यंकय्या नायडूंकडे माहिती आणि प्रसारण खात्याचा पदभार सोपवण्यात आला आहे.
महाराष्ट्रातून धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे आणि रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. रामदास आठवलेंना सामाजिक न्याय राज्यमंत्रिपद दिलं आहे. तर डॉ. सुभाष भामरेंची संरक्षण राज्यमंत्रिपदी वर्णी लावण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाचं खातेवाटप-
स्मृती इराणी नव्या वस्त्रोद्योग मंत्री
व्यंकय्या नायडू नवे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री
रविशंकर प्रसाद नवे कायदा मंत्री
सदानंद गौडा नवे सांख्यिकी आणि नियोजन मंत्री
अनुप्रिया पटेल नव्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री
जयंत सिन्हा नवे विमान वाहतूक मंत्री,
डॉ. सुभाष भामरे नवे परराष्ट्र राज्यमंत्री
रामदास आठवले नवे सामाजिक न्याय राज्यमंत्री,
एम. जे. अकबर परराष्ट्र राज्यमंत्री
हंसराज अहिर केंद्रीय गृहराज्यमंत्री,
नरेंद्रसिंह तोमर केंद्रीय ग्रामविकास मंत्री
राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांना नगरविकास खातं
विजय गोयल नवे क्रीडा मंत्री
एस. एस. अहलुवालिया- राज्यमंत्री
अनंतकुमार- संसदीय कामकाज मंत्री
अर्जुन मेघवाल- अर्थ राज्यमंत्री
पुरुषोत्तम रुपाला- कृषी राज्यमंत्री
मनोज सिन्हा- दूरसंचार खाते
पासवानांकडे ग्राहक संरक्षण खात्याचा अतिरिक्त भार