केंद्रीय पर्यावरणमंत्री अनिल माधव दवे यांचे निधन

By admin | Published: May 18, 2017 09:58 AM2017-05-18T09:58:47+5:302017-05-18T10:48:23+5:30

केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अनिल माधव दवे यांचे निधन झाले

Union Environment Minister Anil Madhav Dave passed away | केंद्रीय पर्यावरणमंत्री अनिल माधव दवे यांचे निधन

केंद्रीय पर्यावरणमंत्री अनिल माधव दवे यांचे निधन

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 18 - केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री अनिल माधव दवे यांचे निधन झाले आहे. ते 60 वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे दवे यांना रात्री उशीरा नवी दिल्लीतील एस्म हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यानच त्यांनी एम्स हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून दवेंची प्रकृती ठिक नव्हती.

नर्मदा नदीच्या बचावासाठी अनिल माधव दवे यांनी खूप काम केले आहे. त्यांनी पर्यावरणाच्या जतनीकरणासाठी अनेक पुस्तकंही लिहिली आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी दवे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरही पुस्तक लिहिले होते. दरम्यान,  पर्यावरण मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांना एक वर्षही पूर्ण झाले नव्हते. 

अनिल माधव दवे यांच्या निधनाच्या वृत्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.  ""माझ्या मित्राच्या अचानक झालेल्या निधनामुळे धक्का बसला आहे. दवे पर्यावरणाचे जतन करण्याच्या दिशेने प्रचंड उत्साही पद्धतीनं कार्य करत होते. काल संध्याकाळी उशीरापर्यंत आम्ही महत्त्वाच्या धोरणांवर एकत्रित चर्चा करत होतो. त्यांच्या निधनामुळे माझे वैयक्तिक नुकसान झाले आहे"", अशी ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. 

 

Web Title: Union Environment Minister Anil Madhav Dave passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.