खासगी रुग्णालयांच्या मनमानीला बसणार चाप; Covishield, Covaxin, Sputnik-V चे कमाल दर निश्चित
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 09:34 PM2021-06-08T21:34:10+5:302021-06-08T21:36:45+5:30
Coronavirus Vaccine Price : सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासगी रुग्णालयांना १५० रूपयांपेक्षा अधिक सेवा शुल्क घेता येणार नसल्याचं म्हटलं होतं. अधिक दर आकारणाऱ्या रुग्णालयांविरोधात होणार कारवाई.
२१ जूनपासून देशात सर्वांचं मोफत लसीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशाला संबोधित करताना केली होती. परंतु यावेळी त्यांनी ज्या नागरिकांना मोफत लस नको असेल आणि ज्यांना खासगी रुग्णालयात जाऊन लस घ्यायची असेल त्यांना ती मिळणार असल्याचंही म्हटलं होतं. परंतु खासगी रुग्णालयांच्या दर निश्चितीला चाप लावत त्यांना केवळ १५० रूपयांचं सेवा शुल्क आकारता येऊ शकेल असं मोदी म्हणाले होते. यानंतर आता कोविशिल्ड (Covishield), कोवॅक्सिन (Covaxin) आणि स्पुटनिक व्ही (Sputnik V) या लसींचे कमाल दर निश्चित करण्यात आले आहेत.
Coronavirus Update : महाराष्ट्रात १०,८९१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; १६ हजारांपेक्षा अधिक रुग्ण करोनामुक्त
खासगी रुग्णाल कोविशिल्ड या लसीचा प्रति डोसा ७८० रूपयांना मिळणार आहे. याममध्ये ६०० रूपये लसीची किंमत + ५ टक्के जीएस आणि १५० रूपयांचे सेवा शुल्क सामील आहे. तर कोवॅक्सिन ही लस १४१० रूपयांना मिळणार असून यामध्ये (१२०० रूपये मूळ किंमत+६० रूपये जीएसटी आणि १५० रूपयांचे सेवा शुल्क सामील आहे. तर खासगी रुग्णालयात स्पुटनिक व्ही ही लस ११४५ रूपये प्रति डोस दरानं देण्यात येईल.
Union Health Ministry caps charges for administration of Covishield at Rs 780, Covaxin at Rs 1,410, and Sputnik V at Rs 1,145 in private hospitals, based on the prices currently declared by vaccine manufacturers.
— ANI (@ANI) June 8, 2021
लसीच्या दर ठरवण्यासोबतच दररोज यावर देखरेखही ठेवली जाणार आहे. अधिक रक्कम घेतल्या संबंधित कोविड लसीकरण केंद्रावर कारवाई केली जाईल. रुग्णालयांना १५० रूपयांपेक्षा अधिक सेवा शुल्क आकारता येणार नाही असं केंद्रानं स्पष्ट केलं आहे. यावर आता राज्य सरकारांना देखरेख ठेवावी लागेल. आरोग्य विभागानं लसीचे कमाल दर निश्चित करत याबाबतीत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मेमोरँडम पाठवलं आहे.