21 सप्टेंबरपासून 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अंशतः सुरू होणार शाळा, केंद्रानं जारी केली नियमावली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 10:11 PM2020-09-08T22:11:15+5:302020-09-08T22:11:22+5:30
शिक्षक, विद्यार्थी आणि शाळेतील कर्मचाऱ्यांना 6 फुटांचे अंतर ठेवणे बंधनकारक राहील. तसेच वेळोवेळी हात धुणे, फेस कव्हर लावणे, शिंक आल्यास तोंडावर हात ठेवणे, स्वतःच्या प्रकृतीकडे स्वतःच योग्य लक्ष देणे आणि थुंकण्यासारख्या गोष्टींवर काटेकोरपणे लक्ष ठेवावे लागेल.
नवी दिल्ली - केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्यान मंत्रालयाने मंगळवारी 9वी ते 12वीपर्यंत अंशतः शाळा सुरू करण्यासंदर्भात स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर (एसओपी) जारी केली आहे. यामुळे आता 21 सप्टेंबरपासून शाळां सुरू व्हायला सुरुवात होईल. मात्र, शाळांना शाळांमध्ये शिकविण्यासंदर्भात निर्णय घेण्याचे स्वतंत्र्य देण्यात आले आहे. क्लास वेग-वेगळ्या टाईम स्लॉटमध्ये चालतील आणि कोरोनाचे लक्षण असणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात येणार नाही.
यानियमांचे पालन सर्वांनाच करावे लागेल -
शिक्षक, विद्यार्थी आणि शाळेतील कर्मचाऱ्यांना 6 फुटांचे अंतर ठेवणे बंधनकारक राहील. तसेच वेळोवेळी हात धुणे, फेस कव्हर लावणे, शिंक आल्यास तोंडावर हात ठेवणे, स्वतःच्या प्रकृतीकडे स्वतःच योग्य लक्ष देणे आणि थुंकण्यासारख्या गोष्टींवर काटेकोरपणे लक्ष ठेवावे लागेल.
This SOP outlines various generic precautionary measures to be adopted in addition to specific measures
— ANI (@ANI) September 8, 2020
to be taken when schools are permitting students (for 9th to 12th class) to prevent the spread of COVID-19: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/BzSUwTROzp
अशी आहे नियमावली -
- शाळेत शिकवायला सुरूवात करण्याबरोबरच ऑनलाईन आणि डिस्टंस लर्निंगदेखील सुरू राहील यावर व्यवस्थापनाला लक्ष द्यावे लागेल.
- शाळांना 9वी ते 12वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्वेच्छेने शाळेत येण्याची परवानगी द्यावी लागेल. म्हणजेच शाळेत येणे विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक असणार नाही.
- विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी पालकांची लेखी परवानगी आणावी लागेल. येणारे-जाणारे आणि विद्यार्थी-शिक्षक यांची भेट वेगवेगळ्या वेळेत होईल.
- केवल कंटेनमेंट झोन बाहेर असलेल्या शांळाच सुरू करण्याची परवानगी असेल.
- कंटेनमेंट झोनमधील विद्यार्थी आणि शिक्षकांना शाळेत येण्याची परवानगी नसेल. तसेच शाळेत येणाऱ्या लोकांना कंटेनमेंट झोनमध्ये जाणे टाळावे लागेल.
- शाळा सुरू करण्यापूर्वी संपूर्ण परिसर, क्लासरूम, लॅब, बॉथरूम सॅनिटाईझ करावे लागेल.
- ज्या शाळांचा वापर, क्वारंटाइन सेंटर म्हणून करण्यात आला होता. त्या व्यवस्थित सॅनिटाईझ कराव्या लागतील.
- 50% टिचिंग आणि नॉन टिचिंग स्टाफला ऑनलाईन टिचिंग आणि टेली काउंसिलिंगसाठी शाळेत बोलावले जाऊ शकते.
- विद्यार्थ्यांसाठी बायोमीट्रिक अटेंडन्स ऐवजी कॉन्टॅक्टलेस अटेंडन्सची व्यवस्था करावी लागेल.
- सातत्याने विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात 6 फुटांचे अंतर असणे आवश्यक असेल.
- लाईनसाठी जमिनीवर 6 फुटांच्या अंतरावर मार्किंग करावी लागेल. ही व्यवस्था वर्गांत आणि बाहेरही असेल.
- सुरक्षितता आणि फिजिकल डिस्टंसिंगचा विचार करता वर्गाबाहेरही शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात चर्चा होऊ शकते.
- संभाव्य, स्पोर्ट्स अॅक्टिव्हिटीज आणि अशा काही इव्हेंट्सना परवानगी नसेल.
- विद्यार्थी आपल्या लॉकरचा वापर करू शकतात. मात्र, फिजिकल डिस्टंसिंग आणि डिसइन्फेक्शनची काळजी घ्यावी लागेल.
- जिमचा वापर गाइडलाइन्सच्या आधारे केला जाऊ शकतो. मात्र, स्विमींगपूल बंदच असतील.
- शिक्षकांना, कर्मचाऱ्यांना फेस मास्क, हँड सॅनिटायझर उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापनाची असेल.
- स्वच्छता कर्मचाऱ्यांना थर्मल गन, डिस्पोझल पेपर टॉवेल, साबन, 1% सोडिअम हायपोक्लोराईट सॉल्युशन द्यावे लागेल.
- अॅसिंटोमॅटिकची ऑक्सीजन लेवल तपासण्यासाठी पल्स ऑक्सीमीटरची व्यवस्था आवश्यक.
- झाकता येईल असे डस्टबीन असावे. तसेच कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणेही आवश्यक
- सफाईकर्मचाऱ्याला कामापूर्वी योग्य प्रकारे प्रशिक्षित करावे लागेल.