केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल कोरोना पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 09:29 PM2020-08-14T21:29:46+5:302020-08-14T21:30:00+5:30
तसेच माझ्या मित्रांना, सहका-यांना तपासणी करण्याची विनंती केली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल हे कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यांनी शुक्रवारी (14 ऑगस्ट) कोरोना संसर्ग झाल्याची ट्विट करून माहिती दिली आहे. ते ट्विट करत म्हणाले की, “माझा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे आणि मार्गदर्शक सूचनांनुसार मी घरी अलगीकरणात आहे. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांची आरोग्य पथक तपासणी करणार आहे. तसेच माझ्या मित्रांना, सहका-यांना तपासणी करण्याची विनंती केली आहे.
शुक्रवारी दिल्लीतील कोरोनामध्ये 1192 नवीन रुग्ण बाहेर आल्याने राष्ट्रीय राजधानीत कोरोना विषाणूच्या संक्रमणाची एकूण संख्या दीड लाखांवर गेली आहे. त्याच वेळी या साथीच्या आजारात एकूण 4,178 लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. दिल्ली सरकारने जाहीर केलेल्या आरोग्यविषयक बुलेटिननुसार, कोरोनामध्ये गेल्या 24 तासांत 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर एकूण मृतांचा आकडा 4,178 झाला आहे.
Dear All,Just to inform that I have tested positive for Covid 19 and initiating home isolation as per guidelines. Requesting all my friends, colleagues for self monitoring. Contact tracing will be done by Health Team. Hoping to see everyone soon.
— lavagarwal (@lavagarwal) August 14, 2020
बुलेटिनमधल्या माहितीनुसार, या कालावधीत आरटी-पीसीआर/सीबीएनएटी/ट्र्यूनॅट पद्धतीने 5,721 तपासणी करण्यात आल्या, तर अँटिजन किटद्वारे 9,324 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. दिल्ली सरकारने म्हटले आहे की राष्ट्रीय राजधानीत संक्रमित लोकांची संख्या 1,50,652 आहे आणि त्यापैकी 11,366 उपचार सुरू आहेत. बुलेटिनच्या माहितीनुसार, उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी 5,882 लोक त्यांच्या घरी उपचार घेत आहेत.
बुलेटिननुसार आतापर्यंत 1,35,108 रुग्ण एकतर दिल्लीत बरे झाले आहेत किंवा दुसर्या ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. दिल्ली सरकारच्या म्हणण्यानुसार, सध्या राष्ट्रीय राजधानीत 532 ठिकाणांना कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत.