भारताची एकही इंच जमीन कोणालाही देण्याइतके भाजपचे मन मोठे नाही : अमित शाह
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 10:10 AM2023-12-12T10:10:51+5:302023-12-12T10:17:09+5:30
३७० कलमाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा विरोधी पक्षांचा मोठा पराभव आहे.
नवी दिल्ली : ३७० कलमाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा विरोधी पक्षांचा मोठा पराभव आहे. भारताची एकही इंच जमीन कोणालाही देण्याइतके भाजपचे मन मोठे नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी राज्यसभेत सांगितले.
ते म्हणाले की, जम्मू-काश्मीरचा भारतात समावेश करण्याची अतिशय महत्त्वाची कामगिरी पं. नेहरू यांच्या राजवटीत काश्मीरमध्ये अवेळी युद्धविराम पुकारण्यात आला. तसे झाले नसते तर पाकिस्तानव्याप्त काश्मीर अस्तित्वात आलाच नसता.
अमित शाह यांनी सांगितले की, भारतीय राज्यघटनेतील ३७० कलम कायमस्वरूपी आहे असे म्हणणारे राज्यघटना व संविधान सभेचा अवमान करत आहेत. ३७० कलमाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर जम्मू-काश्मीरच्या राज्यघटनेस कोणतीही वैधता उरलेली नाही. जम्मू-काश्मीरला योग्यवेळी राज्याचा दर्जा पुन्हा देण्यात येईल, असे आश्वासन मी याआधीच दिले आहे. विरोधकांचा सभात्याग अमित शाह यांच्या भाषणाच्या वेळी काँग्रेससहित अन्य विरोधी पक्षांनी राज्यसभेतून सभात्याग केला होता.