Amit Shah: मंत्रालयाच्या सर्व फाइल्स, मेल, कागदपत्र हिंदीतूनच तयार करा; अमित शाहांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 09:00 PM2022-04-13T21:00:20+5:302022-04-13T21:03:10+5:30

Amit Shah: मंत्रालयाने तयार केलेल्या सर्व फाइल्स, त्यांच्या नोट्स आणि स्टेटमेंट्स हिंदीमध्ये जारी केल्या जात आहेत.

union home minister and bjp leader amit shah ordered officers to create documents and mails in hindi language | Amit Shah: मंत्रालयाच्या सर्व फाइल्स, मेल, कागदपत्र हिंदीतूनच तयार करा; अमित शाहांचे निर्देश

Amit Shah: मंत्रालयाच्या सर्व फाइल्स, मेल, कागदपत्र हिंदीतूनच तयार करा; अमित शाहांचे निर्देश

Next

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशातील राजकीय वातावरण विविध मुद्द्यांवरून तापलेले दिसत आहे. इंधनदरवाढ ते महागाईपर्यंतच्या अनेक विषयांवरून विरोधक केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधताना दिसत आहेत. यातच आता भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी हिंदी भाषेसंदर्भात केलेल्या एका आवाहनाची भर पडली आहे. यावरून केंद्रातील मोदी सरकारसह भाजपवर विरोधकांनी टीका केली आहे. अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना हिंदी भाषेचा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत. 

गृहमंत्रालयाने राज्यांच्या प्रतिक्रियेकडे दुर्लक्ष करून आपल्या कार्यालयीन कामकाजात हिंदीच्या वापराला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. मंत्रालयाने जारी केलेल्या सर्व फाइल्स आणि त्यांच्या नोट्स आणि स्टेटमेंट्स हिंदीमध्ये जारी केल्या जात आहेत. मंत्रालयाने जारी केलेली सर्व निवेदनेही आधी हिंदीत तयार केली जात आहेत. राजभाषा विभागाने अधिकाऱ्यांना हिंदीतही ईमेल पाठवण्यास सुरुवात केली आहे. यासंदर्भात जनसत्ताने वृत्त दिले आहे. 

हा सांस्कृतिक दहशतवाद आहे

यापूर्वी, एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना अधीर रंजन चौधरी म्हणाले, आम्ही हे स्वीकारू शकत नाही. हा सांस्कृतिक दहशतवाद आहे, अशी टीका चौधरी यांनी केली. दुसरीकडे दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनीही अमित शाह यांच्यावर टीका केली. आमची घरे तोडून नका मिस्टर होम मिनिस्टर. We dare you… हिंदीची बळजबरी थांबवा. आम्हाला आमची विविधता प्रिय आहे, आम्हाला आमच्या मातृभाषेविषयी प्रेम आहे, आम्हाला आमची ओळख प्रिय आहे, असे प्रकाश राज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, वेगवेगळ्या राज्यातील लोकांनी एकमेकांशी हिंदीत संवाद साधावा, इंग्रजीत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरवले आहे की सरकार चालवण्याचे माध्यम हे राजभाषा आहे आणि त्यामुळे हिंदीचे महत्त्व नक्कीच वाढेल. आता वेळ आली आहे की राजभाषेला देशाच्या एकात्मतेचा महत्त्वाचा भाग बनवण्याची. जेव्हा इतर भाषा बोलणारे राज्यांचे नागरिक एकमेकांशी संवाद साधतात तेव्हा ते भारताच्या भाषेत असले पाहिजे, असे अमित शाह यांनी म्हटले होते. 
 

Web Title: union home minister and bjp leader amit shah ordered officers to create documents and mails in hindi language

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.