Amit Shah On Shraddha Murder Case: “श्रद्धा वालकरची हत्या करणाऱ्याला दोषीला...” केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचे सडेतोड भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 04:40 PM2022-11-24T16:40:29+5:302022-11-24T16:40:44+5:30

Amit Shah On Shraddha Murder Case: केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी श्रद्धा हत्याकांडावर अगदी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.

union home minister and bjp leader amit shah said delhi police will ensure to strictest punishment in shraddha walker murder case | Amit Shah On Shraddha Murder Case: “श्रद्धा वालकरची हत्या करणाऱ्याला दोषीला...” केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचे सडेतोड भाष्य

Amit Shah On Shraddha Murder Case: “श्रद्धा वालकरची हत्या करणाऱ्याला दोषीला...” केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचे सडेतोड भाष्य

Next

Amit Shah On Shraddha Murder Case: संपूर्ण देशात खळबळ माजवणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांड (Shraddha Walker Murder Case) प्रकरणी दररोज एकामागून एक नवीन खुलासे होत आहेत. श्रद्धाची हत्या करणारा आफताब पूनावालाचे (Aftab Poonawalla) क्रौर्य पाहून संपूर्ण देश हादरला आहे. यावरून आता राजकीय नेत्यांनी आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली आहे. यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या हत्याकांडावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

हा गुन्हा आपल्याकडून त्यावेळी अतीव संतापाच्या भरात झाला. आपण पोलिसांना तपासात सर्वतोपरी सहकार्य करत आहोत, असे आफताबने न्यायालयासमोर सांगितले होते. यानंतर आता आफताबच्या कोठडीत चार दिवसांनी वाढ करण्यात आली. तसेच आफताबच्या लाय डिटेक्टर-पॉलीग्राफ टेस्ट परवानगी देण्यात आली आहे. या प्रकरणावर राज्यासह देशभरातील अनेक नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यातच केंद्रीय गृहमंत्री आणि अमित शाह यांनीही यावर भाष्य केले आहे. 

श्रद्धा वालकरची हत्या करणाऱ्याला दोषीला...

नवी दिल्लीत अमित शाह यांनी पहिल्यांदाच या प्रकरणावर थेट भाष्य केले आहे. दिल्ली पोलीस आणि फिर्यादी पक्ष म्हणजेच सरकारी पक्ष श्रद्धा वालकरचा खून करणाऱ्याला कठोर शिक्षा देईल. ज्याने कोणी श्रद्धा वालकरची हत्या केली असेल त्याला कायद्यानुसार कठोर शिक्षा होईल याची काळजी दिल्ली पोलीस आणि फिर्यादी पक्ष (सरकारी पक्ष) नक्की घेईल, असे अमित शाहांनी म्हटले आहे. 

दरम्यान, आफताब पुनावालाने त्याची लिव्ह-इन पार्टनर असलेल्या श्रद्धाचा १८ मे रोजी दिल्लीतील राहत्या घरी गळा आवळून जीव घेतला. त्यानंतर त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन ते घरातील फ्रिजमध्ये ठेवले होते. तीन आठवडे तो या तुकड्यांची विल्हेवाट लावत होता. आफताबला अवयवांचे अवशेष शोधण्यासाठी मेहरौली येथील जंगलातील एका तलावासह मैदानगढीत तलावापाशी नेण्यात येणार आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: union home minister and bjp leader amit shah said delhi police will ensure to strictest punishment in shraddha walker murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.