भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीयमंत्री अनंत कुमार यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 06:08 AM2018-11-12T06:08:25+5:302018-11-12T06:46:57+5:30

केंद्रीयमंत्री अनंत कुमार यांचे सोमवारी मध्यरात्री निधन झाले.

Union minister Anant Kumar passes away | भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीयमंत्री अनंत कुमार यांचे निधन

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीयमंत्री अनंत कुमार यांचे निधन

बंगळुरू - केंद्रीयमंत्री अनंत कुमार यांचे रात्री उशिरा निधन झाले. बंगळुरूच्या बसवानागुडी येथील श्री शंकर कँसर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, वयाच्या 59 व्या वर्षी सोमवारी मध्यरात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनंतकुमार हे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मोदी सरकारमध्ये मंत्री होते.

अनंत कुमार यांना कर्करोगाचा आजार होता. त्यासाठी लंडनला जाऊनही त्यांनी उपचार घेतले होते. नुकतेच, गेल्या महिन्यात 20 ऑक्टोबर रोजी ते भारतात परतले होते. त्यानंतर, बंगळुरू येथील श्री शंकर कँसर रुग्णालय आणि अनुसंधान केंद्र येथे त्यांना दाखल करण्यात आले होते. अनंत कुमार यांच्या निधनाचे वृत्त समजताच, संरक्षणमंत्री निर्मला सितारमण यांनी शोक व्यक्त केला आहे. आपल्या ट्विटवरवरुन सितारमण यांनी हे वृत्त समजताच अतिशय दु:ख झाल्याचे सांगत अनंत कुमार यांना श्रद्धांजली वाहिली. 




 

 

Web Title: Union minister Anant Kumar passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.