केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे कॅमेऱ्यासमोरच ढसाढसा रडले; पत्रकार परिषदेत काय घडले?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 06:14 PM2023-01-16T18:14:55+5:302023-01-16T18:15:45+5:30

चार दिवसांपासून त्यांनी पाण्याचा एक थेंबही घेतला नाही. मी आधीच दु:खी होतो. या घटनेने मला इतके दुःख झाले की मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकलो नाही

Union Minister Ashwini Choubey Wept Bitterly In Press Conference In Patna | केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे कॅमेऱ्यासमोरच ढसाढसा रडले; पत्रकार परिषदेत काय घडले?

केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे कॅमेऱ्यासमोरच ढसाढसा रडले; पत्रकार परिषदेत काय घडले?

Next

पटणा - केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे सोमवारी पटणा येथील भाजप कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते. पत्रकार परिषदेदरम्यान अजब चित्र सर्वांना पाहायला मिळालं. पक्षाची बाजू मांडताना केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे ढसाढसा रडू लागले. आंदोलनात उपोषणाला बसलेले परशुराम चतुर्वेदी यांच्या निधनाबद्दल ते शोक व्यक्त करत होते. परशुराम चतुर्वेदी आपल्या जमिनीची योग्य किंमत आणि मोबदला या मागणीसाठी बक्सरमध्ये ८६ दिवसांपेक्षा जास्त दिवस आंदोलनाला बसले होते. 

भाजप नेते परशुराम चतुर्वेदी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना मंत्री अश्विनी चौबे म्हणाले की, चतुर्वेदी यांनी शेतकऱ्यांसाठी त्याग केला आहे. चार दिवसांपासून त्यांनी पाण्याचा एक थेंबही घेतला नाही. मी आधीच दु:खी होतो. या घटनेने मला इतके दुःख झाले की मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकलो नाही. बक्सरमध्ये भाजपाकडून जे आंदोलन सुरू होते त्यात परशुराम चतुर्वेदी यांनी सक्रीय भूमिका निभावली होती. 

मिळालेल्या माहितीनुसार, परशुराम चतुर्वेदी यांचे निधन ह्दयविकाराच्या झटक्याने झालं. ते केंद्रीय मंत्र्यांसोबत आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांच्या प्रत्येक पत्रकार परिषदेत, निदर्शनात ते सोबत होते. परंतु जेव्हा परशुराम चतुर्वैदींचे निधन झाले तेव्हा अश्विनी चौबे यांनाही धक्का बसला. त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबवता आले नाहीत. त्यामुळे पत्रकार परिषदेतच ते ढसाढसा रडू लागले. 

सोमवारी केंद्रीय मंत्री रडत असल्याचे फोटो व्हायरल झाले तर रविवारी एका रस्ते अपघातातून ते थोडक्यात वाचले. केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांच्या ताफ्यातील एक वाहन पलटी झाले. या अपघातात अनेक पोलीस जखमी झाले. या दुर्घटनेची माहिती देताना चौबे यांनी ट्विट केले की, बक्सरहून पटणा इथं जाताना मठीला-नारायणपूर मार्गावर ताफ्यातील वाहनाचा अपघात झाला. प्रभू श्री रामाच्या कृपेने आम्ही सुखरुप आहोत. जखमी पोलीस कर्मचाऱ्यांवर डुमराव येथील सदर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Web Title: Union Minister Ashwini Choubey Wept Bitterly In Press Conference In Patna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.