अपघातातील जखमींना पाहून केंद्रीय मंत्र्यांनी थांबवला ताफा अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 02:22 PM2020-06-29T14:22:00+5:302020-06-29T14:23:56+5:30
ट्रकची आणि बाईकची धडक झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात बाईकवर असलेले दोन जण जखमी झाले होते.
नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. तर दुसरीकडे अडचणीत सापडलेल्या व्यक्तींना मदतीचा हात देण्यासाठी अनेक जण पुढाकार घेत आहेत. जोधपूरमध्ये एका ट्रकची आणि बाईकची धडक झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात बाईकवर असलेले दोन जण जखमी झाले होते. मात्र याच दरम्यान त्या रस्त्यावरून केंद्रीय मंत्र्यांचा ताफा जात होता. मंत्र्यांनी ताफा थांबवून लगेचच गाडीतून उतरून जखमींना मदत केली. तसेच आपल्या गाडीने जखमींना रुग्णालयात पाठवल्याची घटना समोर आली आहे.
केंद्रीय जलसंपदामंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना त्वरीत मदत केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेखावत सोमवारी (29 जून) सकाळी बालेसरसाठी रवाना झाले. बकेरू फाटा परिसरात गाडयांचा ताफा पोहताच त्यांना रस्त्यावर गर्दी असल्याचं चित्र दिसलं. त्यावेळी नेमकं काय झालं हे पाहण्यासाठी ते गाडीतून खाली उतरले. रस्त्यावर एक भीषण अपघात झाला असून अपघातात दोन जण गंभीररित्या जखमी झाल्याची त्यांना माहिती मिळाली.
अपघातातील जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी रस्त्यावर जमलेले लोक रुग्णवाहिकेची वाट पाहत होते. केंद्रीय मंत्र्यांनी रुग्णवाहिकेची वाट पाहण्यात वेळ वाया जाऊ दिला नाही. त्यांनी लगेगच आपल्या गाडीने रुग्णांना जवळच्या रुग्णालयात पाठवण्याची सोय केली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रशासनालाही सूचना दिल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : "मला श्वास घेणं शक्य नाही.. बाय ऑल, बाय डॅडी"; कोरोनाग्रस्ताचा 'तो' व्हिडीओ ठरला अखेरचाhttps://t.co/2018Vk2RTj#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia
— Lokmat (@MiLOKMAT) June 29, 2020
CoronaVirus News : शरीरात कसा पसरतो कोरोना व्हायरस?, जाणून घ्याhttps://t.co/2LOl5tuMSI#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia
— Lokmat (@MiLOKMAT) June 29, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : ...म्हणून कोरोनाची कॉलर ट्यून बंद करा; 'या' आमदाराने केली मागणी
शरद पवारांच्या ताफ्यातील पोलीस व्हॅनचा खंडाळा घाटात अपघात
CoronaVirus News : लढ्याला यश! शरीरात कोरोनाचा 'मित्र' आणि 'शत्रू' कोण?; संशोधनातून नवा खुलासा
"विदेशी महिलेच्या पोटी जन्माला आलेली व्यक्ती देशभक्त असूच शकत नाहीत"
CoronaVirus News : पर्यटकांना 'या' देशाने दिली स्पेशल ऑफर, कोरोना झाला तर देणार तब्बल 2 लाख