Shraddha Murder Case : "शिकलेल्या मुली लिव्ह-इनसाठी आई-वडिलांना सोडतात"; श्रद्धा हत्याकांडावर केंद्रीय मंत्र्याचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 01:31 PM2022-11-19T13:31:07+5:302022-11-19T13:44:48+5:30

Shraddha Murder Case And Kaushal Kishore : कोणीही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये जाऊ नये, ज्या मुली लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये जात आहेत, त्यांनी कोर्टातून कागदपत्रे मिळवावीत असं विधान केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांनी केलं आहे. 

union minister Kaushal Kishore statement on shraddha aftab case remarks on live in relationship | Shraddha Murder Case : "शिकलेल्या मुली लिव्ह-इनसाठी आई-वडिलांना सोडतात"; श्रद्धा हत्याकांडावर केंद्रीय मंत्र्याचं विधान

फोटो - ABP न्यूज

Next

श्रद्धा हत्याकांडामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे करण्यात येत आहेत. याच दरम्यान अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. "शिकलेल्या मुलींनी अशिक्षित मुलींकडून शिकले पाहिजे. सुशिक्षित मुली आपल्या आई-वडिलांना लिव्ह-इनसाठी सोडतात. कोणीही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये जाऊ नये, ज्या मुली लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये जात आहेत, त्यांनी कोर्टातून कागदपत्रे मिळवावीत" असं विधान केंद्रीय मंत्री कौशल किशोर (Kaushal Kishore) यांनी केलं आहे. 

"जर मुलीला एखाद्या मुलासोबत राहायचे असेल तर तिने लग्न करावे. जर तुम्हाला मुलगा आवडत असेल आणि त्याच्यासोबत राहायचे असेल तर त्यासाठी योग्य कागदपत्रे तयार केली पाहिजेत. लिव्ह इन रिलेशनशिपसाठी आई-वडील तयार नसतील तर कोर्टात लग्न करावे. वडील आणि आई दोघेही अशा नात्याला विरोध करत असल्याने यासाठी सुशिक्षित मुली जबाबदार" असल्याचं कौशल किशोर यांनी सांगितलं. तसेच सुशिक्षित मुलींनी अशा रिलेशनशिपमध्ये राहू नये असंही म्हटलं आहे. 

केंद्रीय मंत्री एवढ्यावरच थांबले नाहीत, तर ते म्हणाले- "अशा घटना त्या सर्व मुलींसोबत घडत आहेत ज्या शिकलेल्या आहेत आणि विचार करतात की त्या खूप मोकळ्या विचारांच्या आहेत, त्यांच्यात भविष्याचा निर्णय घेण्याची क्षमता आहे. अशा मुली लिव्ह इनच्या जाळ्यात अडकतात. मुलींनी लक्षात ठेवावे की त्या असं नेमकं का करत आहेत."

केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांच्या या विधानानंतर आता वादही सुरू झाला. प्रियांका चतुर्वेदी यांनी ट्विटद्वारे मंत्र्यांवर टीका केली. "आश्चर्य वाटते की, या देशात मुली जन्माला येण्यास जबाबदार आहेत असे त्यांनी म्हटले नाही. निर्लज्ज, निर्दयी आणि क्रूर, सर्व समस्यांसाठी महिलांना जबाबदार धरण्याची मानसिकता फोफावत आहे" असं चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Read in English

Web Title: union minister Kaushal Kishore statement on shraddha aftab case remarks on live in relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.