"आपल्या देशातील हिंदू मंदिरांमध्ये स्वच्छता नाही, मी...", नितीन गडकरींनी व्यक्त केली खंत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 04:01 PM2023-06-01T16:01:21+5:302023-06-01T16:03:47+5:30
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं एक विधान राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं एक विधान राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. त्यांनी हिंदूमंदिरातील स्वच्छता याबद्दल एक खंत व्यक्त केली असून यात सुधारणा करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. उत्तराखंडमधील पिथौरागढ येथून सुरू होणाऱ्या कैलास मानसरोवर मार्गाचे ८० ते ८५ टक्के काम केले असल्याचं त्यांनी सांगितलं. याशिवाय गडकरींनी हिंदूमंदिरांबाबतही एक वक्तव्य केले, जे सध्या फार चर्चेत आहे. आपल्या देशात हिंदू मंदिरांमध्ये स्वच्छता नसल्याचे गडकरींनी नमूद केले.
"मला असं वाटतं की आपला देश असा आहे की, जिथे हिंदू समाजाच्या मंदिरांमध्ये स्वच्छता दिसत नाही. आपल्या देशात हिंदू मंदिरांमध्ये स्वच्छता नसते. धर्मशाळा चांगल्या नसतात. मी लंडनमध्ये एका गुरुद्वारात गेलो होतो, रोमच्या चर्चमध्ये जाऊन आलो काही देशांमधल्या मशिदीही पाहिल्या, तिथलं वातावरण स्वच्छ होतं. ते पाहून मला हे कायमच वाटत होतं की, आपली जी श्रद्धास्थानं आहेत ती स्वच्छ असली पाहिजेत. मला जेव्हा यासाठी काहीतरी करण्याची संधी मिळाली तेव्हा मी महाराष्ट्रातल्या देहू-आळंदी पालखी मार्गासाठी १२ हजार कोटी मंजूर केले. तुळजापूर, गाणगापूर, माहूर ही जी श्रद्धास्थानं आहेत ती चांगल्या प्रकारे विकसित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत", असं गडकरींनी सांगितलं.
#WATCH मुझे महसूस होता है कि हमारा देश ऐसा है जहां विशेष रूप से हिंदू समाज के जो मंदिर हैं वहां स्वच्छता नहीं होती। वहां धर्मशालाएं अच्छी नहीं होती। मैं विदेशों में गया वहां के गुरुद्वारा, मस्जिद, गिरजाघरों में देखा वहां के वातावरण देख मुझे लगता था कि हमारे श्रद्धा के स्थान अच्छे… pic.twitter.com/pEzeU8t9Ln
— ANI_HindiNews (@AHindinews) May 31, 2023
नितीन गडकरी आणखी म्हणाले की, प्रकल्पांना होणारा विलंब कमी करण्यासाठी आणि बांधकामाचा खर्च कमी करण्यासाठी तपशीलवार प्रकल्प अहवाल अचूक बनवण्याची गरज आहे.