“उद्धव ठाकरे यांनी निर्लज्ज राजकारण थांबवावं”; केंद्रीय मंत्र्यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 05:41 PM2021-04-17T17:41:50+5:302021-04-17T17:44:10+5:30
corona and lackness of oxygen: केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. तसेच विरोधी पक्ष भाजपही ठाकरे सरकारवर टीका करत आहे.
नवी दिल्ली: गेल्या सलग तीन दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांची संख्या २ लाखांवर पोहोचली आहे. देशभरातील परिस्थिती गंभीर आणि भीतीदायक होत चालली आहे. कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढल्याने रेमडेसिवीर इंजेक्शन, कोरोना लस यांची कमतरता जाणवू लागली असून, बेड्स आणि ऑक्सिजन यांची व्यवस्था अपुरी पडू लागली आहे. अनेक ठिकाणी रुग्णांचे हाल होताना पाहायला मिळत आहे. अशातच आता राजकारणही तापताना दिसत आहे. केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. तसेच विरोधी पक्ष भाजपही ठाकरे सरकारवर टीका करत आहे. आता केंद्रीय मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. (union minister piyush goyal criticised cm uddhav thackeray on lackness of oxygen)
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर भेदभाव करत असल्याचा आरोप केला होता. यानंतर आता केंद्रीय पियुष गोयल यांनी महाराष्ट्र सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा खरपूस समाचार घेतला आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांचा हा निर्लज्ज राजकारणाचा रोजचा डोस थांबवावा आणि जबाबदारी घ्यावी, अशी टीका गोयल यांनी केली आहे. गोयल यांनी यासंदर्भात ट्विट केली आहेत.
Maharashtra is suffering from an inept & corrupt government & the Centre is doing its best for the people.
— Piyush Goyal (@PiyushGoyal) April 17, 2021
People of Maharashtra are following ‘Majha Kutumb, Majhi Javabadari’ dutifully. It is time the CM also follows his duties in the spirit of ‘Majha Rajya, Majhi Javabadari’
उद्धव ठाकरेंच्या क्लृप्त्या पाहून दुःख
ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरून उद्धव ठाकरेंनी चालवलेल्या क्लृप्त्या पाहून दु:ख झाले. केंद्र सरकार देशात जास्तीत जास्त ऑक्सिजनचे उत्पादन व्हावे, यासाठी प्रयत्नशील आहे. आताच्या घडीला आपल्या क्षमतेच्या ११० टक्के ऑक्सिजनची निर्मिती करत आहोत. उद्योग क्षेत्राचा ऑक्सिजनही वैद्यकीय वापरासाठी उपलब्ध करून दिला जात आहे, असे गोयल यांनी म्हटले आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्राला देशात सर्वाधिक ऑक्सिजन पुरवण्यात आला आहे, असेही गोयल यांनी दुसऱ्या एका ट्विटमध्ये सांगितले.
“पंतप्रधान मोदींना ‘मृत्यूचा उत्सव’ साजरा करण्याची हौस”
केंद्राकडून राज्यांच्या गरजा पुरवण्याचा प्रयत्न
केंद्र सरकार सातत्याने राज्य सरकारांच्या संपर्कात असून त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा शक्य तेवढा प्रयत्न करत आहे. पंतप्रधानांनी घेतलेल्या आढाव्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारांनी या संकटकाळात एकत्रपणे काम करण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्रत सध्या अकार्यक्षम आणि भ्रष्ट सरकार आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राच्या लोकांसाठी योग्य ते काम करत आहे. महाराष्ट्रातील नागरिक माझे कुटुंब माझी जबाबदारीचे योग्य पद्धतीने पालन करत आहेत. आता मुख्यमंत्र्यांनी त्यांची कर्तव्य पाळून माझे राज्य, माझी जबाबदारी हे तत्व पाळण्याची वेळ आली आहे, या शब्दांत गोयल यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.
निवडणुकांमध्ये कोरोनाची ‘रॅली’; बंगालमध्ये ४२० टक्के, तर आसामामध्ये ५३२ टक्के रुग्णवाढ