केंद्रीय मंत्री राम कृपाल यादव यांना महिला कॉनस्टेबलने रोखले
By admin | Published: May 19, 2015 05:56 PM2015-05-19T17:56:53+5:302015-05-19T17:56:53+5:30
केंद्रीय मंत्री राम कृपाल यादव हे आपल्या सहकाऱ्यांसह बाहेर जाण्याच्या मार्गाने विमातळतावर प्रवेश करत असताना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा रक्षक महिलेने त्यांना पाहताक्षणी मज्जाव केला
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - केंद्रीय मंत्री राम कृपाल यादव हे पाटणा चुकीच्या मार्गाने प्रवेश करत असताना सुरक्षा रक्षक महिलेने त्यांना रोखले.
केंद्रीय मंत्री राम कृपाल यादव हे आपल्या सहकाऱ्यांसह बाहेर जाण्याच्या मार्गाने विमातळतावर प्रवेश करत असताना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा रक्षक महिलेने त्यांना पाहताक्षणी मज्जाव केला. सुरक्षा रक्षक महिलेसोबत राम कृपाल यादव हुज्जत घालू लागल्यावर सुरक्षा रक्षक महिलेने वॉकी टॉकीवरून आपल्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुन्हा राम कृपाल यादव व त्यांच्या सहकाऱ्यांना प्रवेश करण्यासाठी असलेल्या दरवाजातून आत येण्यास सांगितले. यादव यांनी अनेकवेळ हुज्जत घालूनही महिला सुरक्षा रक्षक आपल्या मतावर ठआम होती, तसेच तीने आपले कर्तव्य चोखपणे पार पाडल्याचे येथील सीसीटिव्ही कॅमेऱ्यातून लक्षात आले. आपली हुज्जत निष्फळ आहे हे लक्षात आल्यावर यादव यांनी आपली चुक मान्य केली व योग्य त्या प्रवेशद्वारातून प्रवेश केला.
राम कृपाल यादव हे लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षात होते, २०१४ च्या लोकसभेच्या निवडणूकीत त्यांनी भाजपात प्रवेश केला. यादव हे कॅबिनेट मंत्री बंदारु दत्तात्रय यांना भेटण्यास विमानतळावर आले होते.