रामविलास पासवान यांचे निधन; वयाच्या ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2020 01:15 AM2020-10-09T01:15:27+5:302020-10-09T06:52:58+5:30

गेल्या काही आठवड्यांपासून त्यांना दिल्लीतील खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर हृदयशस्त्रक्रिया करण्यात आली होती.

Union Minister Ram Vilas Paswan Dies Days After Heart Surgery | रामविलास पासवान यांचे निधन; वयाच्या ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

रामविलास पासवान यांचे निधन; वयाच्या ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Next

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान (७४) यांचे गुरुवारी निधन झाले. ते पाच दशकांहून अधिक काळ सक्रिय राजकारणात होते आणि देशातील मान्यवर दलित नेत्यांपैकी एक नेते होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ते ग्राहक कल्याण, अन्न व सार्वजनिकमंत्री होते. गेल्या काही आठवड्यांपासून त्यांना दिल्लीतील खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर हृदयशस्त्रक्रिया करण्यात आली होती.

रामविलास पासवान यांचे निधन झाल्याची माहिती त्यांचे पुत्र आणि लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी ट्विट करून दिली. ::पापा... तुम्ही आता या जगात नाहीत; पण मला माहीत आहे की, तुम्ही जिथे कुठे आहात सदैव माझ्यासोबत आहेत, असे टष्ट्वीट चिराग पासवान यांनी केले आहे.
समाजवादी चळवळीचे खंदे समर्थक असलेले रामविलास पासवान यांनी नंतर देशभरात बिहारचे अग्रणी दलित नेते म्हणून ओळख निर्माण केली. १९९० च्या दशकात मंडल आयोग लागू करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. पोलीस अधिकारी म्हणून निवड होऊनही त्यांनी राजकीय क्षेत्राची निवड केली.

जीवनप्रवास
राम विलास पासवान यांचा जन्म ५ जुलै, १९४६ रोजीचा. लोकजनशक्ती पक्षाचे ते अध्यक्ष होते. आठ वेळा लोकसभेवर निवडून गेलेले पासवान सध्या राज्यसभेचे सदस्य होते. त्यांनी त्यांच्या राजकीय किरकीर्दीची सुरुवात संयुक्त सोशालिस्ट पार्टीचा सदस्य या नात्याने केली. ते १९६९ मध्ये बिहार विधानसभेवर निवडून गेले होते. नंतर ते १९७४ मध्ये स्थापन झालेल्या लोकदलात गेले व त्याचे सरचिटणीस बनले. १९७७ मध्ये पासवान लोकसभेवर जागतिक विक्रम ठरला एवढ्या मतांनी निवडून गेले ते हाजीपूर मतदारसंघातून जनता पक्षाचे सदस्य म्हणून. वर्ष २००० मध्ये पासवान यांनी जनता दल सोडून लोक जनशक्ती पक्षाची स्थापना केली व ते त्याचे अध्यक्ष बनले. २००४ मध्ये ते संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये सहभागी झाले व केंद्रीय रसायने व खते मंत्री बनले. २००४ मध्ये ते लोकसभेची निवडणूक जिंकले; परंतु २०१४ मध्ये ते पुन्हा हाजीपूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. पासवान हे जयप्रकाश नारायण यांचे कट्टर अनुयायी होते. १९८३ मध्ये त्यांनी दलित सेनेची स्थापना केली ती दलितांची दास्यातून सुटका करून कल्याणासाठी. १९९६ मध्ये पासवान रेल्वेमंत्री बनले. आॅक्टोबर १९९९ ते सप्टेंबर २००१ पर्यंत ते दूरसंचारमंत्री होते. नंतर ते एप्रिल २००२ पर्यंत कोळसामंत्री होते. २००९ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पासवान यांनी लालूप्रसाद यादव व त्यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दलाशी युती करून लढवली.

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनाने देशाने दूरदृष्टीचा नेता गमावला. पासवान हे पीडित, शोषितांचा आवाज होते.
- रामनाथ कोविंद, राष्ट्रपती
पासवान यांच्या निधनामुळे देशात निर्माण झालेली पोकळी कदाचित कधीच भरून निघणार नाही. माझे दु:ख व्यक्त करण्यास शब्दही नाहीत. पासवान यांचे जाणे हे माझे वैयक्तिक नुकसान आहे. मी मित्र, बहुमोल सहकारी गमावला.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
दिलदार माणूस गमावला
रामविलास पासवान यांच्या रूपात मी बंधूच गमावला. मला आठवते, मी म्हटल्यावर ते एका टपाल कार्यालयाच्याउद््घाटनासाठी यवतमाळला आले होते. मी तेथे म्हटले होते की, देशाचे संचारमंत्री कोणत्या टपाल कार्यालयाच्या उद््घाटनासाठीयेत नाहीत. माझ्या मनात हे आहे की, महाराष्ट्राला टेलिफोन व इंटरनेटसाठी आॅप्टिकल फायबर मिळत नाही. एवढे ऐकताच त्यांनी म्हटले की, मंत्री येतो तेव्हा तो काही घोषणा करून जातो. त्यांनी महाराष्ट्राला आॅप्टिकल फायबर देण्याची घोषणा केली. ते फारच दिलदार व्यक्ती होते. - विजय दर्डा, माजी खासदार,
चेअरमन, लोकमत एडिटोरिअल बोर्ड

Web Title: Union Minister Ram Vilas Paswan Dies Days After Heart Surgery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.