आता काय आम्ही स्वत:ला गळफास लावून घेऊ का?; लस टंचाईबद्दल विचारताच मोदींचे मंत्री भडकले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 10:16 PM2021-05-13T22:16:40+5:302021-05-13T22:19:53+5:30
केंद्रीय रसायनमंत्री सदानंद गौडा पत्रकारांच्या प्रश्नावर संतापले
बंगळुरू: देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं आरोग्य यंत्रणेचं कंबरडं मोडलं आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज साडे लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणाला वेग देण्याची आवश्यकता आहे. मात्र सध्या तरी कोरोना लसींचा तुटवडा असल्यानं अनेक राज्यांमध्ये लसीकरण मोहिमेला ब्रेक लागला आहे. याबद्दल केंद्रीय रसायन मंत्री डी. व्ही सदानंद गौडा यांना प्रश्न विचारण्यात आला. प्रश्न ऐकून गौडा चांगलेच भडकले.
लसींचा पुरेसा साठा नाही आणि तुम्ही वैताग आणणारी कॉलरट्यून का ऐकवता?, कोर्टानं सरकारला झापलं
मोदी सरकारमध्ये असलेल्या गौडा यांना कोरोना लसींच्या उत्पादनाबद्दल आणि तुटवड्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले. त्यावर उत्पादन कमी होतंय म्हणून सरकारमध्ये असलेल्या लोकांनी स्वत:ला गळफास लावून घ्यायचा का, अशा शब्दांत गौडा यांनी संताप व्यक्त केला. 'सर्वांचं लसीकरण व्हायला हवं असं न्यायालयानं चांगल्या हेतूनं म्हटलं. मी तुम्हाला विचारू इच्छितो की उद्या न्यायालयानं म्हटलं, तुम्हाला इतके डोस द्यायचे आहेत आणि तितक्या डोसचं उत्पादन झालं नाही, तर मग आम्ही स्वत:ला गळफास लावून घ्यायचा का?,' असा सवाल गौडा यांनी पत्रकारांना विचारला.
"लस आयातीसाठी राष्ट्रीय धोरण तयार करा, दुसरा डोस देण्यासाठी तातडीने २० लाख डोस द्या"
लसींच्या तुटवड्याबद्दल प्रश्न विचारल्यानंतर गौडा यांनी सरकारच्या योजनांचा उल्लेख केला. 'सरकारचे निर्णय कोणत्याही राजकीय फायद्यासाठी घेतले जात नाहीत. सरकार आपलं काम प्रामाणिकपणे आणि निष्ठेने करत आहेत. यादरम्यान काही त्रुटी समोर आल्या आहेत. मात्र काही गोष्टी आमच्या नियंत्रणात नाहीत. मात्र तरीही परिस्थिती सुधारण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत,' असं गौडा म्हणाले.