"मोदी आणि योगींना मुलं नाहीत, तुमच्याकडून घेऊन ते कुणाला काय देतील"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 09:20 PM2021-03-01T21:20:30+5:302021-03-01T21:23:35+5:30
वादग्रस्त केंद्रीय कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन अजूनही सुरू आहे. सरकार आणि शेतकरी यांच्यातील चर्चा निष्फळ ठरल्या असून, अद्याप यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. यातच केंद्रीय राज्यमंत्री संजीव बलियान (Sanjeev Balyan) यांनी येथे एका किसान महापंचायतीला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्याविरोधात टीका करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
मुजफ्फरनगर : वादग्रस्त केंद्रीय कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन अजूनही सुरू आहे. सरकार आणि शेतकरी यांच्यातील चर्चा निष्फळ ठरल्या असून, अद्याप यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. यातच केंद्रीय राज्यमंत्री संजीव बलियान (Sanjeev Balyan) यांनी येथे एका किसान महापंचायतीला संबोधित केले. यावेळी पंतप्रधाननरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्याविरोधात टीका करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (union minister sanjeev balyan criticized opposition leaders over farm laws)
कृषी कायद्यांवरून केंद्र सरकारसह पंतप्रधाननरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर विरोधकांकडून टीका आणि आरोप केले जात आहेत. संजीव बलियान यांनी विरोधकांवर पलटवार केला आहे. आमच्या नेत्यांमागे कोणीच नाही. ते कुणाला काय देऊन जातील, असे संजीव बलियान यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे हनुमान, कोरोना लस ही संजीवनी; भाजप नेत्याची स्तुतीसुमनं
मोदी आणि योगींना मुलं नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांना मुलं-बाळं नाहीत. यामुळे ते कोणाला काय देणार. मात्र, त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांनी आधी स्वतःकडे पाहावे. भ्रष्टाचार करून आणि खाऊन तुमची पोटं भरली आहेत, अशा शब्दांत संजीव बलियानी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
कृषी कायद्यासंदर्भात अफवा पसरवल्या जात आहेत
ज्यांचे हात रक्ताने माखले आहेत, तेच लोकं शेतकऱ्यांमध्ये जाऊन आपले बस्तान मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. कृषी कायद्यांवरून सतत शेतकऱ्यांमध्ये भ्रम निर्माण केला जात आहे. शेतकर्यांना घाबरवण्याचे काम केले जात आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी हडप केल्या जातील, अशा अफवा पसरवल्या जात आहेत, असा दावा बलियान यांनी यावेळी केला.
प्रशांत किशोर यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा; मिळणार 'इतके' वेतन व 'या' सुविधा
कुणी वाकड्या नजरेने जरी पाहिले तर त्याचे डोळेच फोडू
विरोधकांचा कट शेतकऱ्यांच्या लक्षात आला आहे. शेतकर्यांच्या जमिनीवर कुणी वाकड्या नजरेने जरी पाहिले तर त्याचे डोळेच फोडू, असा इशारा देत पंतप्रधान मोदी आणि मुख्यंत्री योगी आदित्यनाथ हे गरीब कुटुंबातून आले आहेत. कृषी कायद्यामुळे शेतीतून शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळण्याच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास संजीव बलियान यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.