"ओवेसींना त्यांच्या महिलांचे....", भारताची तुलना अफगाणिस्तानशी केल्यानं केंद्रीय मंत्री भडकल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 05:41 PM2021-08-20T17:41:41+5:302021-08-20T17:43:36+5:30

एका कार्यक्रमादरम्यान ओवेसी यांनी केंद्र सरकारला उद्देशून, भारतात महिलांवर अत्याचार होत आहेत, पण त्यांना अफगाणिस्तानची चिंता आहे, असे म्हटले होते.

Union minister Shobha Karandlaje furious over indias comparison with afghan situation said send owaisi to Afghanistan | "ओवेसींना त्यांच्या महिलांचे....", भारताची तुलना अफगाणिस्तानशी केल्यानं केंद्रीय मंत्री भडकल्या

"ओवेसींना त्यांच्या महिलांचे....", भारताची तुलना अफगाणिस्तानशी केल्यानं केंद्रीय मंत्री भडकल्या

Next

नवी दिल्ली - तालिबाननेअफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर, भारतात राजकीय शाब्दिक द्वंद्व सुरू झाले आहे. भारताची तुलना अफगाणिस्तानातील परिस्थितीशी केल्यावरून केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे (Shobha Karandlaje) यांनी AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना देश सोडण्याचा सल्ला दिला आहे. ओवेसींना अफगाणिस्तानला पाठवणेच योग्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यापूर्वी, एका कार्यक्रमादरम्यान ओवेसी यांनी केंद्र सरकारला उद्देशून, भारतात महिलांवर अत्याचार होत आहेत, पण त्यांना अफगाणिस्तानची चिंता आहे, असे म्हटले होते. (Union minister Shobha Karandlaje furious over indias comparison with afghan situation said send owaisi to Afghanistan)

महर्षी वाल्मिकींची तालिबान्यांशी केली तुलना; शायर मुनव्वर राणाविरोधात गुन्हा दाखल

पत्रकारांशी बोलताना केंद्रीय मंत्री म्हणाल्या, "ओवेसींना त्यांच्या महिला आणि समाजाच्या संरक्षणासाठी अफगाणिस्तानात पाठवणेच योग्य आहे." यापूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना विर्देशही दिले होते, की भारत केवळ अफगाणिस्तानच्या नागरिकांनाच संरक्षण देणा नाही, तर येथे येऊ इच्छिनाऱ्या शीख आणि हिंदू अल्पसंख्यकांनाही आश्रय देईल.

काय म्हणाले होते ओवेसी -
ओवेसी म्हणाले होते, 'एका अहवालानुसार, भारतात 9 पैकी एका मुलीचा मृत्यू पाच वर्षांची होण्यापूर्वीच होतो. पण त्यांना (केंद्र सरकार) अफगाणिस्तानात महिलांसोबत जे सुरू आहे, त्याची चिंता आहे. हे येथे होत नाही का?

 तालिबानचा विरोध वाढला; लोक रस्त्यावर, काबुलसह अनेक शहरांत निदर्शने

तालिबानने रविवारीच अफगाणिस्तानात आपल्या विजयाची घोषणा केली होती.  सुमारे दोन दशकांनंतर तालिबानने पुन्हा सत्ता बळकावल्यानंतर भयभीत झालेले अफगाण नागरिक देश सोडून पळून जात आहेत.

 

Web Title: Union minister Shobha Karandlaje furious over indias comparison with afghan situation said send owaisi to Afghanistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.