केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराआधी केंद्रीय कामगार राज्यमंत्री बंडारू दत्तात्रेय यांचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2017 10:29 PM2017-09-01T22:29:42+5:302017-09-01T22:30:11+5:30

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या रविवारी म्हणजेच 3 सप्टेंबरला होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी केंद्रीय कामगार राज्यमंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी शुक्रवारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. 

Union Minister of State for Labor Bundaro Dattatreya resigns before the Union Cabinet expands | केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराआधी केंद्रीय कामगार राज्यमंत्री बंडारू दत्तात्रेय यांचा राजीनामा

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराआधी केंद्रीय कामगार राज्यमंत्री बंडारू दत्तात्रेय यांचा राजीनामा

Next

नवी दिल्ली, दि. 1 - केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या रविवारी म्हणजेच 3 सप्टेंबरला होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी केंद्रीय कामगार राज्यमंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी शुक्रवारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. 
काल रात्री उशिरा केंद्रीय कौशल्य विकास मंत्री राजीव प्रताप रूडी मंत्रिपदाचा राजीनामा सादर केला आहे. याचबरोबर, गंगा शुद्धीकरण खात्याच्या मंत्री उमा भारती यांनीदेखील तब्येतीचे कारण पुढे करत आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. यासोबतच केंद्रीय मंत्री संजीव बाल्यान, कलराज मिश्र आणि महेंद्रनाथ पांडे यांनी देखील राजीनामा सादर केला आहे. सध्या या चौघांच्या राजीनाम्यावर निर्णय घेण्यात आलेला नाही.
दरम्यान, आता केंद्रीय कामगार राज्यमंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी सुद्धा आपल्याचा पदाचा राजीनामा दिला आहे. बंडारू  दत्तात्रेय हे तेलंगणातील सिकंदराबाद येथून लोकसभेवर निवडून आले आहेत. सध्या राजधानी दिल्लीत मंत्रिमंडळ विस्ताराआधी अनेक मोठ्या घडामोडी सुरु आहेत. 



बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जदयूच्या नेत्यांचा समावेश मंत्रिमंडळात होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच अण्णा द्रमुकला मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार असल्याचे समजते. मात्र, अण्णा द्रमुकने यासाठी काहीसा वेळ मागितला असून, त्यामुळे सध्या केवळ मंत्रिमंडळात फेरबदल केला जाऊ शकतो. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी चीन दौ-यावरून परतल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.

गडकरींकडे ‘रेल्वे’ जवळपास निश्चित..
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी फार दिवस राहणार नसल्याचे केलेले विधान व भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांच्या भेटीसाठी मंत्र्यांची झालेली गर्दी यामुळे मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा सुरू झाली. रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे रेल्वे खाते येऊ शकते. तर, सुरेश प्रभू यांना मंत्रिमंडळात कायम ठेवून गंगा शुद्धीकरण आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाची जबाबदारी दिली जाऊ शकते. संरक्षण खात्याची जबाबदारी कोणाकडे येईल हे स्पष्ट नाही. 

Web Title: Union Minister of State for Labor Bundaro Dattatreya resigns before the Union Cabinet expands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा