मोदी सरकारला सात वर्ष पूर्ण; अमित शाह म्हणाले, 'विकासाचा अविरत प्रवास सुरूच राहील'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 04:59 PM2021-05-30T16:59:11+5:302021-05-30T17:02:57+5:30
Union Ministers congratulate PM Modi on 7 years of NDA-led govt in Centre : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला केंद्रात एकूण सात वर्ष पूर्ण झाले आहेत. वर्ष २०१४मध्ये आजच्याच दिवशी पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. केंद्रातील सत्तेत एनडीएला सात वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासह भाजपा नेत्यांकडून मोदी सरकारला शुभेच्छा देण्यात येत आहेत. (Union Ministers congratulate PM Modi on 7 years of NDA-led govt in Centre)
यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी मोदी सरकारने केलेल्या कामांना उजाळा दिला असून, सरकारच्या एकूण कामगिरीबद्दल मत व्यक्त केले आहे. "मागील सात वर्षात देशातील जनतेने पंतप्रधान मोदी यांच्या सेवा आणि सर्मपणावर विश्वास दाखवला आहे. यासाठी मी देशवासियांना नमन करतो. मोदीजींच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आम्ही प्रत्येक संकटावर विजय मिळवून भारताच्या विकासाचा अविरत प्रवास सुरूच राहील, याचा मला पूर्ण विश्वास आहे", असे अमित शाह यांनी म्हटले आहे.
इन 7 वर्षों में मोदी जी ने एक ओर देशहित को सर्वोपरी रखकर अपने दृढसंकल्प और सर्वस्पर्शी व कल्याणकारी नीतियों से गरीब, किसान व वंचित वर्ग को विकास की मुख्यधारा से जोड़कर उनके जीवन को बेहतर बनाया है तो वहीं दूसरी ओर अपने मजबूत नेतृत्व से भारत को एक सशक्त राष्ट्र बनाया। #7YearsOfSeva
— Amit Shah (@AmitShah) May 30, 2021
याचबरोबर, "या सात वर्षांमध्ये मोदीजींनी देशहिताला सर्वोच्च मानून दृढनिश्चय आणि सर्वांसाठी आणि कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून गरीब, शेतकरी आणि वंचित वर्गांना विकासाच्या मुख्य प्रवाहासोबत जोडले. त्यांचे जीवनमान उंचावले. तसेच, आपल्या सशक्त नेतृत्वाच्या बळावर भारताला एक मजबूत राष्ट्र बनवले", असे ट्विटद्वारे अमित शाह यांनी म्हटले आहे.
इन 7 वर्षों में मोदी जी ने एक ओर देशहित को सर्वोपरी रखकर अपने दृढसंकल्प और सर्वस्पर्शी व कल्याणकारी नीतियों से गरीब, किसान व वंचित वर्ग को विकास की मुख्यधारा से जोड़कर उनके जीवन को बेहतर बनाया है तो वहीं दूसरी ओर अपने मजबूत नेतृत्व से भारत को एक सशक्त राष्ट्र बनाया। #7YearsOfSeva
— Amit Shah (@AmitShah) May 30, 2021
दुसरीकडे, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. "सरकारला सात वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन आणि एनडीए परिवाराला शुभेच्छा. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आजचा दिवस सेवा दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. भाजपाचे कोट्यवधी कार्यकर्ते आज एक लाख गावांमध्ये आपली सेवा देणार आहे", असे जे. पी. नड्डा म्हणाले.
याशिवाय, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही एनडीए सरकारची सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. प्रकाश जावडेकर यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, देशाच्या सेवेसाठी आणि लोकांच्या भल्यासाठी सात वर्षे काम केल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे अभिनंदन. आज हा दिवस सेवा दिन म्हणून साजरा केला जात आहे. आपल्या शेजारी होणाऱ्या या कार्यक्रमात तुम्हीही सहभागी व्हावे, असे प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे.