केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री नजमा हेपतुल्ला यांचा राजीनामा

By admin | Published: July 12, 2016 08:48 PM2016-07-12T20:48:38+5:302016-07-12T21:14:44+5:30

केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री नजमा हेपतुल्ला आणि केंद्रीय मंत्री जी एम सिद्धेश्वरा यांनी राजीनामा दिला असून त्यांचा राजीनामा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्वीकारला आहे.

Union Minority Minister Najma Heptullah resigns | केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री नजमा हेपतुल्ला यांचा राजीनामा

केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री नजमा हेपतुल्ला यांचा राजीनामा

Next
>
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12 - मोदी सरकारमध्ये काही दिवसांपूर्वीच मोठे फेरबदल करण्यात आले. काही नव्या मंत्र्यांचाही मंत्रिमंडळात समावेशही करण्यात आला. पण मंत्रिमंडळ विस्ताराला काही दिवस नाही तोपर्यंत दोन केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री नजमा हेपतुल्ला यांनी राष्ट्रपतींकडे राजीनामा सोपवला असून, राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
 तसेच केंद्रीय अवजड उद्योग राज्यमंत्री जी. एम. सिद्धेश्वरा यांनीही दिलेला राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला आहे. विशेष म्हणजे नजमा हेपतुल्ला यांनी 2015-16च्या बजेटमध्ये 98 टक्के खर्च अल्पसंख्याकांसाठी असलेल्या योजनांवर केला होता. नजमा हेपतुल्ला यांची जागा रिकामी झाल्यानं त्यांच्या खात्याचा स्वतंत्र कार्यभार केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वींकडे सोपवण्यात आला आहे. 
त्याप्रमाणेच केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो यांचंही महत्त्व कमी करून त्यांना केंद्रीय अवजड उद्योग खात्याच्या राज्यमंत्रिपदी नियुक्त करण्यात आलं आहे. 'गाव, गरीब आणि किसान'ला प्राधान्य देऊन काही दिवसांपूर्वीच नरेंद्र मोदींनी हे फेरबदल केले होते. या राजीनामा नाट्यामुळे मोदी सरकारमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात आहे. 

Web Title: Union Minority Minister Najma Heptullah resigns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.