Lok Sabha Bypoll: वहिनी-भावोजींमधील मतभेद मिटले, भाजपाचे गणित विस्कटले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 05:21 PM2018-05-24T17:21:16+5:302018-05-24T17:21:16+5:30

उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीत विरोधक एकत्र आल्यानं भाजपाच्या अडचणी वाढल्याचं चित्र आहे

united opposition surprises bjp in kairana loksabha bypoll | Lok Sabha Bypoll: वहिनी-भावोजींमधील मतभेद मिटले, भाजपाचे गणित विस्कटले!

Lok Sabha Bypoll: वहिनी-भावोजींमधील मतभेद मिटले, भाजपाचे गणित विस्कटले!

Next

लखनऊः कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्यातील विरोधकांची एकी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या चिंता वाढवणारी असल्याचं बोललं जातंय. अशातच, उत्तर प्रदेशातील आणखी एका पोटनिवडणुकीत विरोधक एकत्र आल्यानं भाजपाच्या अडचणी वाढल्याचं चित्र आहे. 

कैराना लोकसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या कंवर हसन यांनी राष्ट्रीय लोक दलाच्या तबस्सूम यांना पाठिंबा जाहीर केला आहे. भावोजी-वहिनींच्या या युतीमुळे भाजपाचं गणित विस्कटलंय. कारण, काँग्रेस, बसपा, सपानं त्यांना समर्थन दिलं आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा महाआघाडी विरुद्ध भाजपा असा सामना रंगणार आहे.

भाजपाचे खासदार हुकूम सिंह यांचं फेब्रुवारी महिन्यात निधन झालं. त्यानंतर, कैराना लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी २८ मे रोजी मतदान होणार असून ३१ मे रोजी मतमोजणी आहे. भाजपानं हुकूम सिंह यांची कन्या मृगांका सिंह हिला उमेदवारी दिली आहे. सहानुभूतीच्या लाटेचा तिला फायदा होईल, असा सरळ-साधा विचार भाजपानं केला होता. राष्ट्रीय लोक दलानं तबस्सूम यांना तिकीट देताच, सर्व भाजपाविरोधक त्यांच्या बाजूने उभे राहिले होते. परंतु, त्यांचे तबस्सूम यांचे भावोजी कंवर हसन अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्यानं भाजपाला मोठा आधार मिळाला होता. मुस्लिम मतांचं विभाजन त्यांच्या पथ्यावर पडलं असतं. परंतु, आता कंवर हसन राष्ट्रीय लोक दलासोबत जाणार असल्यानं ही निवडणूक भाजपासाठी कठीण झाली आहे. 

मार्च महिन्यात उत्तर प्रदेशातील फुलपूर आणि गोरखपूर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती. त्यावेळी सपा-बसपा एकत्र आले होते आणि भाजपाला आपले गड गमवावे लागले होते.

Web Title: united opposition surprises bjp in kairana loksabha bypoll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.