अमेरिकेच्या १९ चंद्रमोहिमा अयशस्वी; रशिया, अमेरिका, चीनलाच मिळाले यश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2019 02:45 AM2019-09-08T02:45:02+5:302019-09-08T02:45:25+5:30
इस्रायलचे अंतराळयानही उतरू शकले नव्हते
पुणे : अमेरिकेच्या १९ तर रशियाच्या ५ चंद्रमोहिमा अयशस्वी झाल्यावरच त्यांना चंद्रावर पोहोचण्यात यश मिळाले होते. १३ सप्टेंबर १९६६ रोजी रशियाला चंद्रावर अंतराळयान उतरविण्यात पहिले यश मिळाले होते. रशियाचा स्पुटनिक हा उपग्रह १९५७ मध्ये प्रथम अवकाशात पाठविला. २० जुलै १९६९ रोजी अमेरिकेचे अपोलो ११ हे यान चंद्रावर पोहोचले. चंद्रावरील पहिली मोहीम १७ आॅगस्ट १९५८ अमेरिकेने काढली. मात्र, पायोनिअर ० हे यान पृथ्वीपासून १६ किलोमीटर अंतरावर पोहोचल्यावर गीअरबॉक्समधील बिघाडामुळे कोसळले. २० जुलै १९६९ रोजी मानवी इतिहासातील चमत्कार घडला. नील आर्मस्ट्रॉँग यांनी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले होते.
17 ऑगस्ट १९५८ रोजी चंद्रावरील पहिली मोहीम अमेरिकेने काढली. मात्र, पायोनिअर ० हे यान पृथ्वीपासून १६ किलोमीटर अंतरावर पोहोचल्यावर कोसळले. अमेरिकेने १९५८ च्या ऑक्टोबर महिन्यात पुन्हा प्रयत्न केला. यावेळी पायोनिअर-१ हे अंतराळयान पृथ्वीपासून १ लाख १३ हजार ८०० किलोमीटरपर्यंंत जाऊ शकले. मात्र, दुसऱ्या टप्प्यात यान लवकर विलग झाल्याने कोसळले.
08 नोव्हेंबरला पुन्हा अमेरिकेने पायोनिअर- २ हे अंतराळयान पाठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, या वेळी १५५० किलोमीटर अंतरावर गेल्यावर तिसºया टप्यात कोसळले. रशियाने ४ डिसेंबर १९६८ रोजी पुन्हा लुना ई- १ क्रमांक ३ पाठविले. परंतु, ते उडूच शकले नाही.
06 डिसेंबर रोजी अमेरिकेने पुन्हा पायोनिअर-३ अंतराळयानाचे प्रक्षेपण केले. मात्र, १ लाख २ हजार ३६० किलोमीटर अंतरावर ते कोसळले.
रशियाने २ जानेवारी १९५९ रोजी मेचटा हे अंतराळयान सोडले. मात्र, चंद्रापासून ५९९५ किलोमीटर अंतरावर असताना रॉकेटमधील बिघाडामुळे ते कोसळले. 03 मार्च १९५९ रोजी पायोनिअर-४ हे अमेरिकेचे अंतराळयान प्रथमच पृथ्वीची कक्षा भेदण्यता यशस्वी ठरले. परंतु, दुसºया टप्प्यातील बिघाडामुळे ते कोसळले.
12 सप्टेंबर १९५९ रोजी रशियाचे लुना २ हे अंतराळयान चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचण्यात प्रथमच यशस्वी झाले. रशियाने ४ आॅक्टोबर १९५९ रोजी पुन्हा लुना -३ अंतराळयान यशस्वीपणे चंद्रावर पाठविले. चंद्राची पहिली प्रतिमा मिळाली. 25 सप्टेंबर १९६०, १५ डिसेंबर १९६०, २६ जानेवारी १९६२ रोजी अमेरिकेनेही मोहिमा काढल्या. परंतु, त्या अयशस्वी झाल्या. २३ एप्रिल १९६२ रोजी रेंजर- ५ हे अंतराळयान चंदापर्यंत पोहोचले. परंतु, चंद्रावर कोसळले.
अमेरिकेने २८ जुलै १९६४ रोजी प्रथमच चंद्रावर मोहीम काढली. रेंजर-७ हे अंतराळयान चंद्रावर यशस्वीपणे पोहाचले. पुन्हा १७ फेब्रुवारी रोजीची अमेरिकेची मोहीम यशस्वी ठरली. 18 जुलै १९६५ रोजी रशियाने काढलेली मोहीम यशस्वी ठरली. ३१ जानेवारी १९६६ रोजी रशियाचे लुना- ९हे अंतराळयान यशस्वीपणे झेपावले. ६ फेब्रुवारी रोजी ते चंद्रावर यशस्वीपणे उतरले. अंतराळाच्या इतिहासात चंद्रावर उतरण्याचा पहिला मान रशियाने मिळविला.
31 मार्च १९६६ रोजी रशियाने पाठविलेले लुना-१० अंतराळयान यशस्वीपणे झेपावले आणि चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे स्थिरही झाले.
३० मे १९६६ रोजी अमेरिकेचे सर्व्हेयर-१ हे अंतराळयान प्रथमच चंद्रावर उतरण्यात यशस्वी ठरले.
04 जानेवारी १९५९ रोजी पहिली यशस्वी मोहीम यूएसएसआरची लुना १ ही होती. हे यश सहाव्या मोहिमेत मिळाले. त्यानंतर जुलै १९६४ मध्ये अमेरिकेने रेंजर ७ मिशन सुरू केले. रशियाकडून जानेवारी १९६६ मध्ये सुरू करण्यात आलेल्या लुना ९ मिशनने प्रथमच चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श केला आणि यासोबत प्रथमच चंद्राच्या पृष्ठभागावरील छायाचित्र मिळाले.
22 आॅगस्ट १९६६ रोजी रशियाने सोडलेले लुना-१२ हे अंतराळयान यशस्वीपणे चंद्राच्या कक्षेत स्थिरावले. रशियानेच २१ डिसेंबर १९६६ रोजी लुना-१३ हे अंतराळयान चंद्रावर पाठविले. ते यशस्वीपणे तेथे उतरले आणि चंद्रावरील मातीचा अभ्यासही केला.
अमेरिकेनेही ५ फेब्रुवारी १९६७ रोजी लुनर आॅरबिटर ३ हे अंतराळयान पाठविले. 14 सप्टेंबर १९६८ रोजी रशियाने झोंड- ५ हे अंतराळयान पाठवून इतिहास रचला. त्यामध्ये दोन जीवंत कासवे होती. 21 आॅक्टोबर २००८ रोजी भारताची चांद्रयान १ ही मोहीम यशस्वी झाली. चंद्रावर बर्फाच्या स्वरुपातील पाण्याचा शोध लावला.
२३ आॅक्टोबर २०१३ रोजी चीनने सोडलेल्या चॅँग ५ या अंतराळयानाने चंद्रावरचे नमुने आणले. 07 डिसेंबर २०१८ रोजी चीनने चॅँग ४ हे अंतराळयान सोडले. ते ३ जानेवारी २०१९ रोजी चंद्रावर यशस्वीपणे उतरले. यातील युटू-२ ही बग्गी चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करीत
आहे.
12 आॅगस्ट १९७८ रोजी अमेरिकेनेही आयएसइइ-३ हे अंतराळयान यशस्वीपणे पाठविले २४ जानेवारी १९९० रोजी हायटेन हे अंतराळयान चंद्रावर पाठवून जपाननेही आपल्या अंतराळ कार्यक्रमाला सुरूवात केली. 01 नोव्हेंबर १९९४, २५जुलै १९९४, ७ जानेवारी १९९८, ३० जून २००१ अशा चांद्रमोहिमा अमेरिकेने यशस्वी केल्या.