विरोधकांचे ऐक्य ही तर काल्पनिक कथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 01:24 AM2017-08-09T01:24:25+5:302017-08-09T01:24:42+5:30

विरोधी पक्षांचे ऐक्य ही काल्पनिक कथा असल्याचे सांगून जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला पुन्हा सत्ता मिळण्याचे संकेत दिले.

The unity of the opponents is also the fictional story | विरोधकांचे ऐक्य ही तर काल्पनिक कथा

विरोधकांचे ऐक्य ही तर काल्पनिक कथा

Next

श्रीनगर : विरोधी पक्षांचे ऐक्य ही काल्पनिक कथा असल्याचे सांगून जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला पुन्हा सत्ता मिळण्याचे संकेत दिले.
विरोधी पक्षांचे ऐक्य हे सातत्याने सिंहासारखे डोके, शेळीसारखे शरीर व सर्पासारखे शेपूट असलेला तोंडातून आग ओकत असलेला (ग्रीक पुराणातील) काल्पनिक राक्षस आहे हेच समोर येत. २०१९ मध्ये ते प्रत्येक जण स्वत:साठी एकत्र येऊन आणखी पाच वर्षे भाजपला बहाल करतील,असे अब्दुल्ला टिष्ट्वटरवर म्हणाले.
तो अदूरदर्शीपणा ठरेल
काँग्रेस पक्ष संकटातून प्रवास करीत असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी नुकतेच मान्य केले आहे. त्यांची मते फेटाळून लावल्यास ते अदूरदर्शीपणाचे ठरेल. जयराम रमेश यांच्या मतांचा विचार करतील असे अनेक लोक काँग्रेस पक्षात असतील अशी मला आशा आहे, असे ओमर अब्दुल्ला म्हणाले. 

Web Title: The unity of the opponents is also the fictional story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.