विद्यापीठांत आता ऑगस्टमध्ये प्रवेश प्रक्रिया, सप्टेंबरमध्ये सत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 05:27 AM2020-04-30T05:27:48+5:302020-04-30T05:27:55+5:30
केंद्रीय मानव संसाधनमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी बुधवारी उशिरा या संदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) स्थापन केलेल्या कुहाड समितीच्या शिफारशींना मान्यता दिली आहे.
एस के गुप्ता
नवी दिल्ली : कोविड-१९ मुळे विद्यापीठांचे शैक्षणिक कॅलेंडर २०२० व २०२१ वर्षांसाठी दीड महिना पुढे सरकले आहे. नवीन शैक्षणिक सत्रासाठीची प्रवेश प्रक्रिया जूनऐवजी आॅगस्ट महिन्यात तर शैक्षणिक सत्र एक सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. केंद्रीय मानव संसाधनमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी बुधवारी उशिरा या संदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) स्थापन केलेल्या कुहाड समितीच्या शिफारशींना मान्यता दिली आहे. यूजीसीचे देशातील मान्यताप्राप्त ८०० विद्यापीठांना हे नवे शैक्षणिक कॅलेंडर लागू झाले आहे.
शिफारशी लागू करायच्या आधी बुधवारी निशंक यांच्या अध्यक्षतेखाली येथे प्रदीर्घ बैठक झाली. यावेळी एचआरडी सचिव (उच्चशिक्षण) अमित खरे, यूजीसीचे अध्यक्ष प्रो. डी. पी. सिंह, यूजीसीचे सचिव प्रा. रजनीश जैन आणि शैक्षणिक कॅलेंडरसाठी शिफारशींसाठी स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष व हरयाणा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. आर. सी. कुहाड उपस्थित होते.
मानव संसाधन विकास मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ ला सांगितले की, या नव्या शैक्षणिक सत्राची सुरुवात आणि परीक्षांच्या आयोजनासाठीच्या कुहाड समितीच्या शिफारशी लागू करण्याचे आदेश दिले गेले आहेत.
विद्यापीठांत आठवड्यातील पाच दिवसांऐवजी सहा दिवस शैक्षणिक कामकाज करण्यास सांगितले आहे. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा प्रश्न आहे तेथे समितीने म्हटले आहे की, लॉकडाऊनचे दिवस विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे गृहीत धरले जावेत.
>चालू शैक्षणिक वर्ष २०२० साठी शैक्षणिक वेळापत्रक
१६ मार्च ते १५ मे २०२० पर्यंत ई लर्निंगच्या माध्यमातून अभ्यास.
३१ मे २०२० पासून विद्यार्थ्यांकडून असाइन्मेंट , प्रोजेक्ट रिपोर्ट, इंटर्नशिप रिपोर्ट मागविण्याची प्रक्रिया आॅनलाईन पूर्ण करावी
उन्हाळी सुट्या या १ जून ते ३० जून दरम्यान असतील
१ जुलै ते ३१ जुलै २०२० दरम्यानपरीक्षा होतील
३१ जुलै ते १४ आॅगस्टपर्यंत उत्तरपत्रिका तपासणी व निकाल घोषित करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.
>शिफारशीनुसार नवीन शैक्षणिक वर्षासाठी वेळापत्रक
१ आॅगस्ट २०२० ते ३१ आॅगस्ट २०२० दरम्यान प्रवेश
प्रक्रिया.
१ आॅगस्ट २०२० पासून द्वितीय व तृतीय वषार्चे, तर १ सप्टेंबर पासून नवीन.शैक्षणिक वर्षांचे वर्ग सुरु करण्यात यावेत.
१ जानेवारी २०२१ पासून २५ जानेवारी २०२१ पर्यंत परीक्षा घेण्यात याव्यात.
२७ जानेवारी २०२१ पासून पुन्हा वर्ग सुरु होतील आणि २१ जून २०२१ पर्यंत येतील.
१ जुलै ते ३० जुलै दरम्यान उन्हाळी सुटी दिली जाईल आणि २ आॅगस्ट २०२१ पासून दुसºया स्ट्रेस प्रारंभ करण्यात यावा.