विद्यापीठाचे मिशन ‘नॅक’

By admin | Published: September 11, 2014 12:57 AM2014-09-11T00:57:02+5:302014-09-11T00:57:02+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाने केलेल्या तयारीच्या आधारावर नॅककडून ए ग्रेड भेटण्याची अपेक्षा करीत आहे. परंतु त्यांचा अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे. बुधवारी नॅक

University Mission 'nac' | विद्यापीठाचे मिशन ‘नॅक’

विद्यापीठाचे मिशन ‘नॅक’

Next

काय मिळणार ? : अभ्यासक्रम, ग्रंथालय, फर्निचरसह लेटलतिफी बनली अडचण
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाने केलेल्या तयारीच्या आधारावर नॅककडून ए ग्रेड भेटण्याची अपेक्षा करीत आहे. परंतु त्यांचा अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे. बुधवारी नॅक कमिटीच्या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी ही बाब पुढे आली.
‘नॅक’ कमिटी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाने नॅकचे निकष पूर्ण करण्यासाठी कुठलीही कमतरता ठेवली नाही. परंतु दौऱ्याच्या सुरुवातीलाच एकामागून एक अशा अनेक त्रुट्या उघडकीस आल्या. संथ गतीने झालेली विकास कामे, अभ्यासक्रम अपडेट नसणे, विभागांच्या ग्रंथालयातील अनेक त्रुटी, वर्गांमध्ये तुटलेले व जुने फर्निचर, उद्यान व शैक्षणिक परिसरात उगवलेले जंगली गवत, वृक्षांच्या साफसफाईकडे दुर्लक्ष आदीं बाबींकडे नॅकच्या दोन्ही चमूने नोटीस केल्या. तसेच विभागांच्या भेटी दरम्यान विभागप्रमुखांच्या लक्षातसुद्धा या गोष्टी आणून दिल्या.
सूत्रांनुसार दौऱ्यादरम्यान नॅक सदस्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे विभागप्रमुखांजवळ नव्हती. काही विभागांकडे तर त्यांच्या अभ्यासक्रमांच्या प्रती सुद्धा नव्हत्या. वर्षभरातील कामकाज सादर करण्यासाठी त्यांच्याकडे कुठलेही ठोस दस्तऐवज नव्हते. विभागप्रमुखांनी त्रुटी लपविण्याचा भरपूर प्रयत्न केला. परंतु ते अपयशी ठरले. यावर नॅक चमूने विभागांची कानउघाडणी सुद्धा केली.
बुधवारी जेव्हा नॅक चमू विद्यापीठ शैक्षणिक परिसरात दाखल झाली. तेव्हा अनेक विभागांचे रंगरंगोटी व साफसफाईचे काम सुरू होते. मास कम्युनिकेशन, ललित कल विभाग, कॅम्पस ग्रंथालयसह अनेक विभागांची तयारी अजून सुरूच होती. सायंकाळपर्यंत सर्व काम पूर्ण होईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
पहिल्या दिवशी शैक्षणिक विभागांना भेटी
कर्नाटक विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. ए.एम. पठाण यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय अधिस्वीकृती व प्रत्यायन परिषदेच्या सात सदस्यीच चमूने बुधवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला सकाळी ९ वाजता भेट दिली. कुलगुरू अनुपकुमार यांनी चमुचे स्वागत केले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, कुलसचिव डॉ. अशोक गोमाशे, बीसीयुडी संचालक डॉ. श्रीकांत कोमावार, आयक्युएसी संचालक डॉ. सी.प. काणे, वित्त व लेखा अधिकारी पूरण मेश्राम उपस्थित होते. स्वागतांनतर कुलगुरुंनी विद्यापीठाच्या मागील चार वर्षाच्या कारकिर्दीतील वाटचालीचे पॉवर पॉर्इंट सादरीकरण केले. यानंतर नॅक चमूने दोन चमूमध्ये विभागणी करुन पाहणी केली. यात दोन्ही टीमने विद्यापीठ परिसरातील विविध स्नातकोत्तर शैक्षणिक विभागांची पाहणी केली.

Web Title: University Mission 'nac'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.