विद्यापीठ अत्याचार प्रकरणात तपासाधिकार्यांची साक्ष जिल्हा न्यायालय : संशयित आरोपींचे जबाब नोंदवण्यासाठी आज कामकाज
By admin | Published: May 11, 2016 12:26 AM2016-05-11T00:26:29+5:302016-05-11T00:26:29+5:30
जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील शिक्षक भवनात विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाच्या खटल्यात मंगळवारी तपासाधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सारिका कोडापे यांची सरकार पक्षातर्फे साक्ष नोंदवण्यात आली.
Next
ज गाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील शिक्षक भवनात विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाच्या खटल्यात मंगळवारी तपासाधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सारिका कोडापे यांची सरकार पक्षातर्फे साक्ष नोंदवण्यात आली.न्यायाधीश एस.के. कुलकर्णी यांच्या न्यायालयात मंगळवारी हे कामकाज झाले. सरकार पक्षातर्फे ॲड.गोपाळ जळमकर यांनी सारिका कोडापे यांची साक्ष नोंदवली. कोडापे यांनी साक्षीत सांगितले की, विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाची जबाबदारी माझ्यावर सोपवलेली होती. त्यानुसार मी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील घटनास्थळी जाऊन चौकशी केली होती. त्याचप्रमाणे संशयित आरोपी अला अब्देल राहत असलेल्या औरंगाबाद येथील खोलीचीदेखील चौकशी करून काही पुरावे गोळा केले होते. या प्रकरणाचे तपासकाम पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी साक्षीत दिली. त्यानंतर दोन्ही संशयित आरोपींचे न्यायालयाकडून जबाब नोंदवण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यासाठी ११ मे रोजी पुन्हा कामकाज होण्याची शक्यता आहे. संशयितांकडून ॲड.सागर चित्रे व ॲड.अकील इस्माइल कामकाज पाहत आहेत.