पाकमधील अज्ञाताने फोनवरून मोदींना ठार मारण्यासाठी दिली 50 कोटींची ऑफर
By admin | Published: May 22, 2017 01:39 PM2017-05-22T13:39:31+5:302017-05-22T13:39:50+5:30
मध्य प्रदेशमधल्या सतना जिल्ह्यातील कुशल सोनी नावाच्या व्यक्तीला पाकिस्तानातून एका अज्ञात व्यक्ती फोन केला.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - गेल्या काही दिवसांपासून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दहशतवाद्यांच्या रडारवर आहेत. मध्य प्रदेशमधल्या सतना जिल्ह्यातील कुशल सोनी नावाच्या व्यक्तीला पाकिस्तानातून एका अज्ञात व्यक्ती फोन केला. 25 मे रोजी मुंबईत होणा-या रॅलीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींना बॉम्बस्फोट घडवून उडवून देण्यासाठी 50 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे, अशी माहिती अज्ञात फोनकर्त्यानं दिली असून, तो पाकिस्तानातून बोलत असल्याचं सांगितलं आहे. +79651219 या नंबरवरून त्या अज्ञात पाकिस्तानी व्यक्तीनं फोन केला होता.
कुशल सोनी या व्यक्तीनं पोलिसांत लेखी तक्रार दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हाही दाखल केला असून, पोलीस त्या फोन कॉलचा अधिक तपास करत आहेत. सध्या तरी पोलिसांचा सायबर सेलच्या माध्यमातून तपास सुरू आहे. तत्पूर्वी मध्य प्रदेशमधल्या इंटेलिजन्सनं उत्तर प्रदेश पोलिसांना अलर्ट केलं होतं की, दहशतवादी भगवा वेष परिधान करत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. सतना पोलीस अधीक्षक मिथिलेश शुक्ला यांच्या मते, पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. सायबर सेल याचा तपास करत आहेत. सतनामधल्या रामनगरमधले रहिवासी कुशल सोनी यांना शनिवारी संध्याकाळी 4 वाजून 50 मिनिटांनी सतनाच्या रामनगरमधल्या कुशल सोनी यांना एक कॉल आला. फोन करणा-या व्यक्तीनं 25 मे रोजी मुंबईत होणा-या रॅलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना बॉम्बस्फोट घडवून उडवून द्यायचं आहे.
बॉम्बस्फोट घडवण्यासाठी दोन लोक तयार आहेत. तुम्हीही या कटात सामील व्हा, असं कुशल सोनी यांना सांगण्यात आलं आहे. यासाठी तुम्हाला पाहिजे तेवढी रक्कम देण्यात येईल. मात्र त्यानं स्वतःचं नाव नाही सांगितलं. कुशल सोनीला पहिल्यांदा वाटतं कोणीतरी त्याची चेष्टा करत आहे. मात्र मोबाईल नंबर पाहिल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीनच हलली. त्यानंतर सोनी यांनी याची तक्रार रामनगर पोलिसांत केली आणि बोलण्याचं रेकॉर्डिंग पोलिसांना सुपूर्द केलं. रामनगर पोलीस ठाण्याचे प्रमुख मिश्रा म्हणाले, हा फोन परदेशातून आला होता. फोन करणा-याची भाषा गुजराती वाटत होती. गेल्या काही दिवसांपूर्वीच सतनाच्या बलराम आणि राजीव नावाच्या दोन पाकिस्तानी गोपाळ एसटीएफनं अटक केली आहे.