धक्कादायक! रात्रभर हायवेवर पडून होता महिलेचा मृतदेह; शेकडो वाहनं गेली, सकाळी फक्त सांगाडा उरला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 10:01 AM2021-06-15T10:01:21+5:302021-06-15T10:01:40+5:30

महिलेच्या कपड्यांवरून ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू; पोलिसांकडून घेतला जातोय सीसीटीव्हीचा आधार

Unknown Woman Died In Road Accident in uttar pradesh Hapur | धक्कादायक! रात्रभर हायवेवर पडून होता महिलेचा मृतदेह; शेकडो वाहनं गेली, सकाळी फक्त सांगाडा उरला

धक्कादायक! रात्रभर हायवेवर पडून होता महिलेचा मृतदेह; शेकडो वाहनं गेली, सकाळी फक्त सांगाडा उरला

Next

हापूड: उत्तर प्रदेशातल्या हापूडमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. हापूडमधील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९ वर एक अपघात झाला. वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर महिलेचा मृतदेह रात्रभर महामार्गावर पडून होता. रात्रभरात मृतदेहावर शेकडो वाहनं गेली. मात्र कोणीही गाडी थांबवण्याची तसदी घेतली नाही. रविवारी रात्री हा संपूर्ण प्रकार घडला.

सोमवारी सकाळी पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी त्यांना तिथे काळीज पिळवटून टाकणारं दृश्य पाहायला मिळालं. महिलेच्या मांसाचे तुकडे रस्त्यावर पसरले होते. मृतदेहावरून वाहनं गेल्यानं काही तुकडे चाकांना लागून काही किलोमीटरपर्यंत गेले. पोलिसांना घटनास्थळी महिलेनं परिधान केलेल्या वस्त्रांखाली केवळ सांगाडा आढळून आला. आता पोलीस वस्त्रांच्या आधारे महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. 

बाबूगढमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९ वर कुचेसर फाट्यावर एका अज्ञात महिलेला वाहनानं धडक दिली. गंभीर जखमी झाल्यानं महिला जागीच कोसळली. त्यानंतर दुसऱ्या वाहनानं तिला चिरडलं. रविवारी रात्री ११ ते १२ च्या दरम्यान हा अपघात झाला. रात्रभर या महिलेच्या मृतदेहावरून वाहनं जात होती. मात्र कोणीही गाडी थांबवली नाही. 

सकाळी पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी महिलेचं मांस गायब झालं होतं. पोलिसांना केवळ महिलेचा सांगाडा आढळून आला. वाहनांच्या चाकांना लागून महिलेच्या मांसाचे तुकडे रस्त्यावर अनेक किलोमीटरपर्यंत गेले. आता पोलीस महिलेच्या कपड्यांवरून ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. याशिवाय सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा आधारही घेतला जात आहे.

Web Title: Unknown Woman Died In Road Accident in uttar pradesh Hapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.