Unlock 1: कोरोनाची वाढती संख्या पाहता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्राची नवी गाईडलाईन, काय आहेत नियम?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 01:38 PM2020-06-09T13:38:29+5:302020-06-09T13:39:02+5:30
अनलॉक १ च्या पहिल्या टप्प्यात केंद्राने सरकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याबाबत सांगितलं, मात्र गेल्या काही दिवसांत सरकारी कार्यालयात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे.
नवी दिल्ली – देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत देशात २ लाख ५० हजारांहून जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर ७ हजारापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. १ जूनपासून केंद्र सरकारने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणून अनलॉक १ सुरु केलं आहे. मात्र देशात कोरोना व्हायरसचा धोका आणखी वाढत असल्याचं दिसून येत आहे.
अनलॉक १ च्या पहिल्या टप्प्यात केंद्राने सरकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याबाबत सांगितलं, मात्र गेल्या काही दिवसांत सरकारी कार्यालयात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मंगळवारी केंद्र सरकारने याबाबत नवी गाईडलाईन जारी केली आहे. या नव्या मार्गदर्शक सुचनांनुसार यापुढे ज्या कर्मचाऱ्यांमध्ये कोणतीही लक्षणं दिसत नाही अशांनाच कार्यालयात येण्याची परवानगी दिली आहे.
काय आहेत केंद्र सरकारचे नवीन नियम
- सर्दी / खोकला किंवा ताप असल्यास त्या कर्मचाऱ्याने घरीच राहावं.
- कन्टेन्मेंट झोनमध्ये राहणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी घरुनच काम करावं. जोपर्यंत कन्टेन्मेंट झोन हटत नाही तोवर अशा कर्मचाऱ्यांनी कार्यालयात येऊ नये
- एका दिवसात २० पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहू नये, यासाठी रोस्टर बनवण्यात यावं. बाकी कर्मचाऱ्यांनी घरुन काम करावं.
- जर एका कॅबिनमध्ये दोन अधिकारी असतील तर त्यांनी एक दिवसआड कार्यालयात यावं.
- पूर्ण वेळ मास्क लावणे आवश्यक आहे. जे मास्क लावणार नाहीत त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.
- सोशल डिस्टेंसिंगच पालन करणे गरजेचे
- अधिकाऱ्यांनी स्वत:च्या कॅम्प्युटरची सफाई स्वत: करावी
- शक्य तेवढे दूर राहून बैठका आणि कामकाज करावं.
Government of India issues fresh guidelines for officials and staffers of Central Government to prevent spread of #COVID19, after several officials in various Central Government Ministries/Departments have tested positive . pic.twitter.com/A3ZbF2unbB
— ANI (@ANI) June 9, 2020
अनलॉक १ दरम्यान, देशात कोरोना व्हायरसचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोना व्हायरसच्या एकूण रुग्णांची संख्या २ लाख ६६ हजार ५९८ इतकी झाली आहे तर आतापर्यंत ७ हजार ४६६ लोकांचा बळी गेला आहे. त्याचबरोबर, गेल्या २४ तासात कोरोनाचे ९ हजार ९८७ नवीन रुग्ण नोंदवले गेले आहेत.