Unlock 1: हॉटेलमध्ये जाण्यापूर्वी फॉर्म भरावा लागणार; Entry आणि Exit पर्यंत ‘या’ ७ गोष्टी विसरु नका!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 10:49 AM2020-06-05T10:49:42+5:302020-06-05T11:24:54+5:30
६५ वर्षावरील व्यक्ती, गर्भवती महिला आणि १० वर्षापेक्षा लहान मुलांना घराच्या बाहेर पडू नये असा सल्ला देण्यात आला आहे.
नवी दिल्ली – कोरोना संक्रमण रोखण्यासाठी संपूर्ण देशात गेल्या २ महिन्यापासून लॉकडाऊन सुरु होता, त्यानंतर आता अनलॉक १ चा पहिला टप्पा सुरु झाला आहे. केंद्र सरकारने गुरुवारी रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल्स आणि कार्यालये उघडण्यासाठी काही नियम-अटींवर परवानगी दिली आहे. या नियमांचे पालन याठिकाणी जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने करणं बंधनकारक आहे. मात्र ही सुविधा कन्टेंन्मेंट झोनसाठी पूर्णपणे बंद आहे.
६५ वर्षावरील व्यक्ती, गर्भवती महिला आणि १० वर्षापेक्षा लहान मुलांना घराच्या बाहेर पडू नये असा सल्ला देण्यात आला आहे. काही अत्यावश्यक असेल तरच अशा लोकांनी घराबाहेर पडावं. हॉटेल्स आणि रेस्टॉरंटच्या ठिकाणी काही नियम लावण्यात आले आहेत. त्यामुळे खालील ७ गोष्टींचे पालन तुम्ही स्वत:च्या सुरक्षेसाठी करावं असं आवाहन करण्यात आलं आहे.
- दोन व्यक्तींमध्ये कमीत कमी ६ फूट अंतर ठेवावं तसेच मास्क घालणे बंधनकारक आहे. हात धुण्याची आणि हँड सॅनिटायझरची व्यवस्था करावी. शिंकताना अथवा खोकताना विशेष लक्ष द्यावे. कोणत्याही जागी थुंकल्यास कडक कारवाई होईल. सर्वांना आरोग्य सेतू डाऊनलोड करणे आणि वापर करणे गरजेचे आहे.
- हॉटेल अथवा रेस्टॉरंटच्या प्रवेशावर हँड सॅनिटायझर आणि थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था करावी लागेल. केवळ विना लक्षण असणाऱ्या स्टाफ आणि लोकांना आत जाण्यास परवानगी असेल. त्याचसोबत मास्क घालणाऱ्यांनाच प्रवेश मिळेल. सोशल डिस्टेंसिंगचं पालन करण्यासाठी नियमांनुसार स्टाफची संख्या असावी. स्टाफला ग्लोव्स आणि अन्य सुरक्षेच्या नियमांचे पालन करावे लागेल.
- शक्य असल्यास हॉटेल, रेस्टॉरंटमधील वस्तू, कर्मचारी आणि अतिथींसाठी स्वतंत्र प्रवेश आणि बाहेर जाण्याचा पर्याय असावा. लिफ्टमधील लोकांची संख्या देखील मर्यादित असेल. पाहुण्यांना त्यांच्या प्रवासाचा तपशील रिसेप्शनमध्ये द्यावा लागेल आणि फॉर्म भरावा लागेल. कोविड -१९ च्या प्रतिबंधासाठी पोस्टर किंवा स्टँड लावावे लागतील.
- सर्व हॉटेल्स किंवा रेस्टॉरंट्समधील पेमेंटसाठी कॉन्टैक्टलस पर्याय निवडावा लागेल. सामान खोलीवर पाठवण्यापूर्वी, निर्जंतुक करणे अनिवार्य असेल. रेस्टॉरंटमध्ये बसण्याची व्यवस्था सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांना ध्यानात घेऊन करावी. कपडे, नॅपकिन्सऐवजी चांगल्या प्रतीचे डिस्पोजेबल नॅपकिन्स वापरावे लागतील.
- खाण्यासाठी रूम सर्व्हिस किंवा टेकवेला प्रोत्साहित करावे लागेल. फूड डिलिव्हरी स्टाफ अन्न हॉटेलच्या रुमवर पोहचवतील. होम डिलिव्हरीच्या कर्मचार्यांचे थर्मल स्क्रीनिंग केले पाहिजे. खोलीच्या सेवेसाठी, कर्मचारी आणि अतिथी यांच्यामधील इंटरकॉमद्वारे संवाद झाला पाहिजे. खोलीत किंवा इतरत्र हवेच्या स्थितीचे तापमान 24 ते 30 डिग्री सेंटीग्रेड असावे, तर आर्द्रता 40 ते 70 टक्क्यांच्या दरम्यान असावी.
- सर्व ठिकाणी स्वच्छता करावी लागेल. दरवाजाची कडी, लिफ्ट बटण यासारख्या जास्त स्पर्श होणाऱ्या वस्तूंना १ टक्के सेझियम हायपोक्लोराइटद्वारे साफ करावे. चेहरा कव्हर्स, मास्क किंवा संरक्षणासाठी वापरल्या जाणार्या इतर गोष्टींची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य ती व्यवस्था असली पाहिजे. वॉशरुम अधूनमधून स्वच्छ करावे लागतात.
- एखाद्या व्यक्तीमध्ये कोरोना विषाणूची लक्षणे आढळल्यास, त्या व्यक्तीस एका खोलीत आयसोलेटेड करावे. त्यांना एक मास्क किंवा चेहरा कव्हर प्रदान करावा लागेल. त्यानंतर माहिती जवळच्या वैद्यकीय सुविधेस द्यावी लागेल. तपासणीनंतर व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळल्यास, संपूर्ण क्षेत्र निर्जंतुकीकरण करावे लागेल.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
बाजारपेठा गजबजणार; राज्यात निर्बंध शिथिल; वाचा काय सुरु राहणार?
...अन् ७ वर्षाच्या मुलीने थेट पोलीस ठाणे गाठलं; घडलेला प्रकार ऐकून पोलीसही हादरले
शेतात काम करताना जमिनीत नांगर अडकला; शेतकऱ्याला सोने-रत्नांचा मोठा खजिना सापडला
फेसबुकनंतर अमेझॉनची भारतात गुंतवणूक; ‘या’ बड्या टेलिकॉम कंपनीसोबत २ अब्ज डॉलर्सचा करार?
कोरोनाच्या नावाखाली लुटालूट; किराणा मालासह अन्य वस्तू चढ्या भावाने