Unlock4: जाणून घ्या 1 सप्टेंबरपासून काय सुरु राहणार, काय बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 20:41 IST2020-08-29T20:38:56+5:302020-08-29T20:41:07+5:30
Unlock4 guidelines: येत्या 7 सप्टेंबरपासून दिल्ली मेट्रोसेवा सुरु होणार असून आंतरराज्य आणि राज्यांतर्गत व्यक्ती आणि माल वाहतुकीला सूट देण्यात आली आहे. म्हणजेच देशात कुठेही मुक्त संचार करता येणार आहे.

Unlock4: जाणून घ्या 1 सप्टेंबरपासून काय सुरु राहणार, काय बंद
केंद्र सरकारने Unlock4 ची घोषणा केली असून नवीन गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यामध्ये दिल्ली मेट्रो, शाळा, राज्यांतर्गत आणि आंतरराज्य वाहतुकीबाबत महत्वाचे निर्णय घेतले आहेत. जाणून घ्या नव्या गाईडलाईनुसार काय सुरु आणि काय बंद राहणार...
हे सारे सुरु होणार आहे....
- 7 सप्टेंबरपासून दिल्ली मेट्रो सेवेला परवानगी. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागणार.
- 21 सप्टेंबरपासून सामाजिक, शैक्षणिक, खेळ, करमणूक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय आदी कार्यक्रमांना 100 व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्क, हँडवॉश, थर्मल स्कॅनिंग बंधनकारक.
- 21 सप्टेंबरपासून ओपन एअर थिएटरला परवानगी
- 21 सप्टेंबरपासून 50 टक्के शिक्षक आणि बिगर शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी शाळा उघडण्याची परवानगी.
- 21 सप्टेंबरपासून शिक्षकांचा सल्ला घेण्यासाठी 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांना शाळेत आलटून पालटून जाता येणार.
- 21 सप्टेंबरपासून टेक्निकल आणि प्रोफेशनल प्रोग्रॅम्स (लॅब प्रॅक्टिकलची गरज असलेले) पोस्ट ग्रॅज्युएशनचे विद्यार्, पीएचडी विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण संस्था उघडता येणार आहेत.
हे बंद राहणार
- कंटेनमेंट झोनमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत कडक लॉकडाऊन आहे. (lockdown continues in containment zones) यामध्ये कोणत्याही प्रकारची सूट दिली जाणार नाही.
- सिनेमा हॉल, एंटरटेनमेंट पार्क बंद राहणार आहेत.
- स्वीमिंग पूल सारख्या जागा बंद राहणार आहेत.
- 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांना कंटेनमेंट झोन असेल तर त्या शाळेत जाता येणार नाही.
Unlock4: ई-पासचे बंधन संपले; देशात लॉकडाऊन 31 सप्टेंबरपर्यंत वाढला