सीमा भागात दिसले मानवरहित हवाई वाहन
By admin | Published: October 5, 2016 04:17 AM2016-10-05T04:17:37+5:302016-10-05T04:17:37+5:30
जम्मू आणि काश्मीर आणि पंजाब विभागाजवळील पश्चिम सेक्टरमधील भारत-पाकिस्तानच्या सीमेजवळच्या भागात मानवरहित हवाई वाहनांची (युएव्ही) हालचाल
नबीन सिन्हा, नवी दिल्ली
जम्मू आणि काश्मीर आणि पंजाब विभागाजवळील पश्चिम सेक्टरमधील भारत-पाकिस्तानच्या सीमेजवळच्या भागात मानवरहित हवाई वाहनांची (युएव्ही) हालचाल पाहिल्याची माहिती सीमा सुरक्षा दलांनी (बीएसएफ) मंगळवारी गृह मंत्रालयाला दिली.
२९ सप्टेंबर रोजी भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल आॅपरेशनपासून सीमा भागात तणाव निर्माण झालेला आहे. अतिरेक्यांकडून भारतात होणारी संभाव्य घुसखोरी किंवा हल्ले रोखण्यासाठी तयारीचा भाग म्हणून बीएसएफने पंजाब आणि जम्मू आणि काश्मीर भागात एकूणच सुरक्षा वाढविली आहे. त्याचप्रमाणे भारत-बांगलादेश सीमेला लागून असलेल्या पूर्व आघाडीवर दक्षता अधिक करण्यात आली आहे. दहशतवादी पूर्व मार्गाचा वापर हल्ल्यांसाठी करू नये हा त्यामागील उद्देश आहे. सशस्त्र दले आणि हवाईदल हाय अलर्टवर आहे. तणावाचा कोणताही प्रसंग उद््भवला तर नियंत्रण रेषेवर आम्ही लष्कराच्या मदतीला उपलब्ध असू, असे बीएसएफचे महासंचालक के. के. शर्मा यांनी सांगितले.
गृहमंत्रालय आणि सीमा सुरक्षा दलाने भारत-पाकिस्तान सीमेवरील बऱ्याच भागांत तणाव कमी करण्यासाठी व संरक्षण दलांवर व लष्करी संस्थांवरील हल्ले रोखण्यासाठी संयुक्तपणे प्रयत्न केले. सीमा सुरक्षा दल युएव्हीलाही तोंड द्यायला तयार आहे. हे युएव्ही नियंत्रण रेषेवर १०० मीटर भागात आढळले. कोणत्याही आव्हानाला तोंड द्यायला सगळी दले तयार आहेत. भारत-पाकिस्तान सीमेवरील काश्मीर आणि पंजाबमधील खेड्यांतील रहिवाशांना तेथून निघून जा, असे बीएसएफने सांगितलेले नाही, असे बीएसएफच्या प्रमुखांनी सांगितले.