अविवाहित सरकारी कर्मचारी अपत्य संगोपन रजेस पात्र

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 05:33 AM2020-10-28T05:33:28+5:302020-10-28T07:04:52+5:30

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी ही घोषणा करताना म्हटले की, याबाबतचा आदेश २०१८ मध्येच दिला गेला आहे; परंतु अनेक लोकांना त्याबद्दल माहिती नाही. 

Unmarried government employees are eligible for childcare | अविवाहित सरकारी कर्मचारी अपत्य संगोपन रजेस पात्र

अविवाहित सरकारी कर्मचारी अपत्य संगोपन रजेस पात्र

Next

नवी दिल्ली : केंद्र सरकारने अविवाहित पुरुष सरकारी कर्मचारी जर एकट्याने अपत्याचे संगोपन करत असेल तर त्याला अपत्य संगोपन रजा  जाहीर केली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी ही घोषणा करताना म्हटले की, याबाबतचा आदेश २०१८ मध्येच दिला गेला आहे; परंतु अनेक लोकांना त्याबद्दल माहिती नाही. 

अपत्य संगोपन रजा ही महिला कर्मचाऱ्यास दिली जाते. ती सेवेच्या संपूर्ण कालावधीत जास्तीत जास्त दोन वर्षे व मूल १८ वर्षांचे होईपर्यंत दिली जाते. ही रजा पगारी रजा असते. मात्र, ती एकाच वर्षात तीनपेक्षा जास्त वेळा मंजूर होत नसते. रजेच्या ७३० दिवसांपैकी कर्मचारी पहिल्या ३६५ दिवसांचे पूर्ण व पुढील ३६५ दिवसांचे ८० टक्के वेतन मिळवतो. मूल शारीरिक व मानसिकदृष्ट्या दुबळे असेल तर ते मूल २२ वर्षांचे होईपर्यंत पालक अपत्य संगोपन रजा घेऊ शकतात, ही अट काढण्यात आली. 

Web Title: Unmarried government employees are eligible for childcare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.