संतापजनक! फी जमा न केल्याने शाळेत सर्वांसमोर केला अपमान; रडून रडून विद्यार्थिनीने गमावला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 05:19 PM2021-08-08T17:19:14+5:302021-08-08T17:21:33+5:30
unnao evicted from school for non payment of fees girl who fainted died : लॉकडाऊनमुळे कुटुंबीय फी भरू शकत नव्हते. फी-माफीची विनंती करणारं एक पत्र घेऊन स्मृती शाळेच्या मुख्याध्यापकांकडे गेली होती.
नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. लॉकडाऊनमध्ये अनेकांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या उन्नावमधील एका शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलीची शाळेतून घरी आल्यावर अचानक तब्येत बिघडली. कुटुंबीयांनी तातडीने मुलीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शाळेची फी (School Fees) भरली न गेल्यामुळे शाळेच्या व्यवस्थापनाकडून मुलीचा सर्वांसमोर अपमान करण्यात आला आणि तिला घरी पाठवण्यात आल्याचा गंभीर आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आदर्शनगर परिसरातील रहिवासी असलेले सुनील अवस्थी यांनी तेरा वर्षांची मुलगी स्मृती ही सरस्वती विद्या मंदिर या शाळेत दहावीत शिकत आहे. सध्या कोरोनाच्या संसर्गामुळे सर्वत्र ऑनलाईन क्लास सुरू आहेत. त्यामुळे स्मृतीचे देखील ऑनलाईन क्लास सुरू होते. मात्र लॉकडाऊनमुळे कुटुंबीय फी भरू शकत नव्हते. त्यामुळे तिचे ऑनलाईन क्लास हे बंद करण्यात आले होते. फी-माफीची विनंती करणारं एक पत्र घेऊन स्मृती शाळेच्या मुख्याध्यापकांकडे गेली होती. मात्र त्यांनी ते पत्र स्वीकारण्यास नकार दिला होता.
धक्कादायक! ड्रग्ससाठी जन्मदाता पिताच झाला हैवान; परिसरात खळबळ#Crime#Policehttps://t.co/ayBubpOnKv
— Lokmat (@MiLOKMAT) August 8, 2021
शाळेमध्ये स्मृतीचा चारचौघांत अपमान करून तिला तिथून हाकलून लावलं असा आरोप आहे. या प्रकारामुळे निराश झालेली स्मृती रडत रडत घरी पोहोचली आणि बेशुद्ध पडली. नेमकं काय घडलंय हे तिच्या कुटुंबीयांना कळेपर्यंत तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी स्मृतीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणाचा तपासही पोलिसांनी सुरू केला. मुलीच्या वडिलांनी सरस्वती विद्यामंदिर शाळेचं व्यवस्थापन आणि मुख्याध्यापक यांच्याविरोधात तक्रार दाखल केली असून, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
गणेश मंदिरात समाजकंटकांची तोडफोड; सोशल मीडियावर Video जोरदार व्हायरल#Pakistan#templeattack#Policehttps://t.co/Se2vBfcuHT
— Lokmat (@MiLOKMAT) August 8, 2021
नात्याला काळीमा! ड्रग्स विकत घेण्यासाठी बापाने 40 हजारात मुलाला विकलं अन्...
आसाममध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. मोरीगन जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. ड्रग्ससाठी एका बापाने आपल्या अडीच वर्षांच्या मुलाला 40 हजार रुपयांना विकल्याचं उघड झालं आहे. गुवाहाटीपासून जवळपास 80 किमी दूर असलेल्या लहरीघाट गावात हा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी मुलाच्या आईने पोलिसात तक्रार दिल्यानंतर हा खुलासा झाला आहे. तक्रारीनुसार, आरोपी अमीनुल इस्लाम याने आपल्या मुलाला साजिदा बेगम नावाच्या व्यक्तीला विकलं होतं. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल होताच अधिक वेगाने तपास सुरू केला.
धक्कादायक! कारमधील चारही तरुणी नशेत होत्या; घटनेने खळबळ#crime#Policehttps://t.co/ZtsGGSNUFk
— Lokmat (@MiLOKMAT) August 8, 2021