पोलिसांच्या आश्वासनानंतर उन्नावमधील पीडितेच्या मृतदेहावर कुटुंबीयांकडून अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 02:19 PM2019-12-08T14:19:50+5:302019-12-08T14:20:27+5:30
बऱ्याच वादविवादानंतर उन्वाव येथे जिवंत जाळण्यात आलेल्या बलात्कार पीडितेच्या मृतदेहावर अखेर अंत्यसंस्कार करण्यात आले.
उन्नाव (उत्तर प्रदेश) - बऱ्याच वादविवादानंतर उन्वाव येथे जिवंत जाळण्यात आलेल्या बलात्कार पीडितेच्या मृतदेहावर अखेर अंत्यसंस्कार करण्यात आले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत पीडितेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतल्याने उन्नावमधील बलात्कार पीडितेवरील अंत्यसंस्कारांबाबत तिढा निर्माण झाला होता. अखेरीस पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर पीडितेचे कुटुंबीय अंत्यसंस्कारासाठी तयार झाले.
Unnao: Mortal remains of Unnao rape victim being taken for last rites. She passed away during treatment at Delhi's Safdarjung Hospital on December 6 pic.twitter.com/i5WPLUZ0AB
— ANI UP (@ANINewsUP) December 8, 2019
उन्नाव बलात्कारातील पीडितेचा शुक्रवारी रात्री दिल्लीताल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला होता. दरम्यान, पीडितेचा मृतदेह काल सायंकाळी उन्नावला आणण्य़ात आला होता. मात्र जोपर्यंत योगी आदित्यनाथ येत नाही तोपर्यंत पीडितेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका घेतली. अखेरीस पोलिसांनी समजूत काढल्यानंतर पीडितेचे कुटुंबीय अंत्यसंस्कारास तयार झाले. ''उन्नावमधील बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांना 24 तास संरक्षण देण्यात येईल. पीडितेच्या भावाला आत्मसंरक्षणासाठी शस्त्र परवाना देण्यात येईल, पीडितेच्या बहिणीला नोकरी आणि कुटुंबीयांना दोन घरे देण्यात येतील. तसेच या घटनेमधील दोषींविरोधात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन पीडितेच्या कुटुंबीयांना देण्यात आले,'' अशी माहिती लखनौचे पोलीस आयुक्त मुकेश मेश्राम यांनी दिली.
Mukesh Meshram, Lucknow Commissioner: We have decided to provide 24 hours security to the victim's sister & security will also be given to other family members. As demanded by the victim's brother we will provide him license to hold arms as per Arms Act, for self defense. pic.twitter.com/ontu0e2Ffv
— ANI UP (@ANINewsUP) December 8, 2019
पीडितेच्या कुटुंबाचे म्हणणे आहे की आरोपी जेलमधून सुटून आल्यानंतर त्यांना सतत धमकी देत होता आणि याआधीही त्याने अनेकदा पीडितेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. या पीडितेवर मागील वर्षी बलात्कार झाला होता. दोन आरोपींपैकी एका आरोपीला दहा दिवसांपूर्वीच जामीन मिळाला होता. दरम्यान, पीडितेच्या खटल्याची तारीख रायबरेली कोर्टात गुरुवारी होती. त्यासाठी उन्नावमधून रायबरेलीला जात असताना आरोपींनी पीडितेच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शिवम, त्याचे वडील रामकिशोर, शुभम, हरिशंकर आणि उमेश बाजपेयी यांना अटक केली आहे.
Mukesh Meshram, Lucknow Commissioner: We will also arrange for a job for victim's sister. Under Pradhan Mantri Awas Yojana we will provide two houses to the family. Stringent action will be taken against the culprits. https://t.co/XVSmDdqoTj
— ANI UP (@ANINewsUP) December 8, 2019