Unnao Rape Case : भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगरला कठोरातील कठोर शिक्षा द्यावी, पीडितेची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2018 08:19 AM2018-04-13T08:19:07+5:302018-04-13T08:55:28+5:30
पीडित तरुणीनं कुलदीप सिंह सेनगरविरोधात कठोरातील कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.
नवी दिल्ली - उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणी सीबीआयने कारवाई करत भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर यांना ताब्यात घेतले आहे. सीबीआयने पहाटे 4.30 वाजता ही कारवाई केली आहे. सीबीआयच्या लखनऊ कार्यालयात कुलदीप सिंह सेनगरची चौकशी सुरू आहे.
दरम्यान, पीडित तरुणीनं कुलदीप सिंह सेनगरविरोधात कठोरातील कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.
''भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगरविरोधात कारवाई करुन त्याला कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी'', अशी मागणी पीडितेनं केली आहे.
दरम्यान, सेनगरविरोधात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भारतीय दंडसंहितेच्या कलम 363 (अपहरण), 366 (महिलेचे अपहरण), 376 (बलात्कार), 506 (गुन्हेगारी धमकी) आणि अल्पवयीन मुलांच्या लैंगिक संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
भाजपा आमदार कुलदीपसिंग सेनगर व त्यांच्या साथीदारांनी जून 2017 मध्ये बलात्कार केल्याचा आरोप पीडित तरुणीनं केला आहे. याप्रकरणी न्याय मिळावा यासाठी युवती व तिच्या कुटुंबीयांनी रविवारी (8 एप्रिल) मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर केलेला आत्मदहनाचा प्रयत्न सुरक्षारक्षकांनी हाणून पाडला होता. या वेळी युवतीच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र त्यांना पोलीस कोठडीत रविवारी रात्री अत्यवस्थ वाटू लागले. परंतु उनाव जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी ते मरण पावले.
आयोगाची सरकारला नोटीस
राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने यूपी सरकार आणि राज्याच्या पोलीसप्रमुखांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणाचा चोवीस तासांत अहवाल देण्याचे त्यांना सांगण्यात आले असून, पीडित कुटुंबाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देशही दिले आहेत.
भाजपा आमदाराच्या भावाला अटक
युवतीवर बलात्कार केल्याप्रकरणी भाजपाचे आमदार कुलदीप सिंह सेनगर यांचा भाऊ अतुलसिंग सेनगर याला उनाव येथून लखनऊ क्राइम ब्रँचने अटक केली आहे. कुलदीपसिंह व अतुलसिंह या दोघांनी युवतीच्या वडिलांना आठवडाभरापूर्वी मारहाण केल्याचीही तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती. यासंदर्भात युवतीने पत्रकारांना सांगितले की, दोन्ही भावांनी माझ्या आयुष्याचे मातेरे केले आहे. दोन्ही भावांना अटक झाली पाहिजे.
I want strict action should be taken against him and he should be given severe punishment: #Unnao rape victim on BJP MLA Kuldeep Singh Sengar detained by CBI pic.twitter.com/0jlhnDXpU8
— ANI UP (@ANINewsUP) April 13, 2018
#WATCH Earlier visuals of BJP MLA Kuldeep Singh Senger, main accused in Unnao rape case, detained by CBI. pic.twitter.com/k9krGucGD1
— ANI UP (@ANINewsUP) April 13, 2018